Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

12 Dec 2023, 16:08 वाजता

परळी विधानसभा लढण्यास पंकजा मुंडे इच्छुक?

 

Pankaja Munde : काही दिवसांपूर्वी बीड लोकसभेची जागा पंकजा मुंडे लढवणार अशी चर्चा रंगली होती...मात्र, आता परळी विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचे संकेत पंकजा मुंडेंनी दिलेत...परळीच्या जागेचा निर्णय वरिष्ठ घेतील, असं विधान पंकजांनी केलंय...तर फडणवीस आणि आपल्यात मतभेद असले तरी मित्रत्त्वाचे नातं असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12 Dec 2023, 15:12 वाजता

वंध्यत्वाने निराश दाम्पत्यांसाठी दिलासा?

 

IVF Proposal : आई बाबा होण्याची इच्छा असलेल्या दाम्पत्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी.. IVF उपचार पद्धतीच्या खर्चासाठी आता सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता आहे... अपत्य प्राप्तीसाठीचे IVF किंवा सरोगसी हे उपचार खार्चिक आहेत.. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत त्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवलाय.. या योजनेची मर्यादा पाच लाखांपर्यंत करण्यात आल्याने IVF किंवा सरोगसीचा यात समावेश होऊ शकतो.. राज्य सरकारने हा प्रस्ताव मंजूर केल्यास वंधत्वामुळे अपत्य प्राप्तीपासून वंचित असलेल्या जोडप्यांना दिलासा मिळणार आहे

12 Dec 2023, 13:57 वाजता

अर्थखात्याची दोरी फडणवीसांकडे

 

Ajit Pawar & Devendra Fadanvis : अजित पवार अर्थमंत्री असले तरी फडणवीसांच्या हाती अर्थखात्याची दोरी आहे...अर्थखात्याची प्रत्येक आधी फडणवीसांकडे फाईल जाणार...अमित शाहांच्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतरच अजित पवारांना अर्थखातं मिळाल्याची माहिती मिळतेय...फडणवीसांचं वर्चस्व मान्य केल्यावरच अजित पवारांना अर्थखातं मिळालं...असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 13:23 वाजता

जागावाटपाबाबत राष्ट्रवादीची नवी भूमिका-सूत्र

 

Ajit Pawar Camp : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत अजित पवार गटाची नवी भूमिका मांडल्याची माहिती अजित पवार गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. लोकसभेत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी खराब कामगिरी असलेल्या खासदारांना डच्चू देण्यात यावा अशी भूमिका अजित पवार गटानं घेतलीय. लवकरच महायुतीची बैठक घेण्यात येणार असून त्या  बैठकीत खासदारांच्या कामगिरीबाबत चर्चा करणार असल्याचंही अजित पवार गटाच्या सूत्रांनी सांगितलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 12:40 वाजता

लक्ष्मण हाके यांना कारणे दाखवा नोटीस

 

Laxman Hake : राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर लक्ष्मण हाके यांना नोटीस बजावण्यात आलीय. ठाकरे गटाचे प्रवक्ते असल्याचे कारण देत मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या लक्ष्मण हाके यांना मागासवर्ग आयोगानं कारणे दाखवा नोटीस दिलीय. हाके यांनी राज्य सरकारवर विविध आरोप करत राजीनामा दिला होता. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 12:36 वाजता

बीएमसीचं ऑडिट, ठाकरे अडचणीत?

 

Sachin Ahir Vs Atul Bhatkhalkar : तर बीएमसीच्या ऑडिटवरून राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्यायत...राजकीय हेतूतून बीएमसीची चौकशी होत असून, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची चौकशी करा अशी मागणी सचिन अहिर यांनी केलीय...तर कर नाही तर ठाकरेंना डर कशाला?...भ्रष्टाचाराचा एक एक रुपया बाहेर काढून मुंबईकरांना देऊ अशी प्रतिक्रिया भातखळकरांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 12:34 वाजता

मुंबई महापालिकेचे गेल्या 25 वर्षांचं ऑडिट होणार

 

BMC Audit : मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 25 वर्षातील आर्थिक कारभाराचे ऑडिट होणार आहे... उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिलीय...ऑडिटसाठी सरकारकडून 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, नियोजन, नगरविकास, वित्त विभागाचे सचिव चौकशी समितीत आहेत...पुढील अधिवेशनात समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे...यामुळे गेली 25 वर्षे बीएमसीवर सत्ता असलेल्या ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताय...मात्र, ऑडिटमुळे मिरच्या का झोंबतायत? नागपूर, पुणे महापालिकेची चौकशी करायची असेल तेव्हा करू अशी प्रतिक्रिया सामंतांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 12:31 वाजता

शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज?

 

Nagpur Winter Session : अवकाळीने नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी शुक्रवारी मदतीची घोषणा होणार.. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांची माहिती.. मुख्यमंत्री आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 11:06 वाजता

आरक्षण न देण्यासाठी एका नेत्याचा सरकारवर दबाव - जरांगे

 

Manoj Jarange : मराठा आरक्षण न देण्यासाठी एका नेत्याचा सरकारवर दबाव असून, एकाच्या दबावामुळे मराठ्यांच्या पोरांवर सरकार अन्याय करत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय...भुजबळांचं नाव न घेता जरांगेंनी गंभीर आरोप केलाय...कितीही काही झालं तरी आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केलाय...जरांगेंची तब्येत बरी नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत...मात्र, आजच्या नियोजित कार्यक्रमाला जाणार असल्याची माहिती जरांगेंनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 10:04 वाजता

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आजच SIT स्थापन होणार

 

Disha Saliyan : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणारेय. कारण दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राज्य सरकार आजच एसआयटी स्थापन करणारेय. सरकार एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश आजच जारी करणारेत. त्यासंदर्भात राज्य सरकारनं मुंबई पोलिसांना आदेश दिलेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -