Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

12 Dec 2023, 10:02 वाजता

छगन भुजबळांविरोधातील याचिका ईडीकडून मागे

 

Chagan Bhujbal : ईडीने छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घेतलीय... महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या भुजबळांना दोन वर्षांनी जामीन मंजूर झाला होता. भुजबळांना त्यानंतर परदेशात जाण्यासाठीही मंजुरी देण्यात आली.. मात्र यालाच ईडीने हायकोर्टात आव्हान दिलं होतं.. हे प्रकरण सप्टेंबर महिन्यात सुनावणीसाठी आलं होतं.. मात्र ही याचिका कशासाठी केली ते आठवत नसल्याचा अजब दावा ईडीकडून करण्यात आला होता. या दाव्यावर आश्चर्य व्यक्त करत हायकोर्टाने ईडीला वेळ दिला होता. नुकतीच याप्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. तेव्हा ईडीने ही याचिका मागे घेतली.. तसंच त्यांचा पुतण्या समीर भुजबळांविरोधातही याचिकाही मागे घेतलीय... मात्र त्यांचा मुलगा पंकजा भुजबळांविरोधातली याचिका कायम ठेवण्यात आलीय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 09:42 वाजता

राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता नर्सरी आणि केजीचं शिक्षण

 

Government Starts KG & Nursary : राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता नर्सरी-केजीचं शिक्षण मिळणार आहे...2023-24 या शैक्षणिक वर्षात बालवाडी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय...यामुळे सरकारी शाळेची पटसंख्या वाढेल...तसेच, शिक्षक भरतीची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलंय...शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'शाळेत चला अभियान' राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 09:19 वाजता

राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त होणार

 

Backword Class Commission : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त होणार आहे...मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडेंचा राजीनामा मंजूर झालाय...त्यामुळे आता मागासवर्ग आयोग बरखास्त होणार आहे...शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन राजीनामा दिल्याचं निरगुडेंनी पत्रात म्हटलंय...निरगुडेंच्या आधी 4 सदस्यांनी राजीनामे दिलेयत...10 पैकी 5 जणांनी राजीनामे दिल्याने आयोग बरखास्त होणार आहे...आज विधीमंडळात मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे...त्याआधीच आयोग बरखास्त होणार असल्याची बातमी समोर आल्याने विधीमंडळात गोंधळ होण्याची शक्यताय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 09:04 वाजता

सात सार्वजनिक प्रकल्पांमुळे मुंबईत प्रदूषण?

 

Mumbai Air Pollution : मुंबईतल्या सात सार्वजनिक प्रकल्पांमुळे शहरात धुळीचं साम्राज्य पसरलंय. हे प्रकल्प हवेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असल्याच्या बातम्यांची दखल हायकोर्टानं घेतलीय. या प्रकल्पांमुळे प्रदूषण होत आहे की नाही याची संयुक्त पाहणी करण्याचे आदेश महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेत. वांद्रेमधल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण, मेट्रो, बुलेट, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर, वर्सोवा-वांद्रे सी लिंक आणि मधुपार्क मार्ग हे प्रकल्प राबवणा-या कंत्राटदारांकडून प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं उघड झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 08:36 वाजता

सांगलीतील ऊस दर कोंडी अखेर फुटली

 

Sangali Raju Shetty : सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याची ऊस दर कोंडी अखेर फुटलीये...36 तासांपासून सुरू असलेलं आंदोलन राजू शेट्टींनी मागे घेतल्याची घोषणा रात्री केली...एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्याचं दत्त इंडियाकडून पत्र देण्यात आल्यानंतर राजू शेट्टींनी काटा बंद आंदोलन मागे घेतलंय...मात्र, इतर 15 कारखान्यांविरोधात आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे...त्याचबरोबर आज स्वाभिमानी शेतकरी संघटना शिराळा तालुक्यातील दालमिया साखर कारखान्यावर धडकणार असून तेथे आंदोलन करण्यात येणार असल्याचं राजू शेट्टी म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 08:35 वाजता

छगन भुजबळांविरोधातील याचिका ईडीकडून मागे

 

Chagan Bhujbal : ईडीने छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घेतलीय... महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या भुजबळांना दोन वर्षांनी जामीन मंजूर झाला होता. भुजबळांना त्यानंतर परदेशात जाण्यासाठीही मंजुरी देण्यात आली.. मात्र यालाच ईडीने हायकोर्टात आव्हान दिलं होतं.. हे प्रकरण सप्टेंबर महिन्यात सुनावणीसाठी आलं होतं.. मात्र ही याचिका कशासाठी केली ते आठवत नसल्याचा अजब दावा ईडीकडून करण्यात आला होता. या दाव्यावर आश्चर्य व्यक्त करत हायकोर्टाने ईडीला वेळ दिला होता. नुकतीच याप्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. तेव्हा ईडीने ही याचिका मागे घेतली.. तसंच त्यांचा पुतण्या समीर भुजबळांविरोधातही याचिकाही मागे घेतलीय... मात्र त्यांचा मुलगा पंकजा भुजबळांविरोधातली याचिका कायम ठेवण्यात आलीय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

12 Dec 2023, 07:53 वाजता

तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला

 

Tuljabhawani Crown Found : बातमी झी २४ तासच्या इम्पॅक्टची... तुळजाभवानी देवीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट अखेर सापडलाय. देवीला वाहिलेल्या दागिन्यांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल देण्याआधीच हा मुकूट गायब झाल्याचं समोर आलं होतं. झी २४ तासनं ही बाब समोर आणल्यानंतर समितीकडून तातडीनं फेरपाहणी करण्यात आली. त्यामध्ये जुना आणि नवीन दोन्ही मुकूट आढळून आले. हा मुकुट डबा क्रमांक तीनमध्ये नोंदीप्रमाणे सापडलाय. संबंधित मुकुटाची तपासणी करताना त्यावरची नक्षी, त्यावरील कलाकुसर, मुकुटातील हिरे-मोती तेच आहेत का? याची खात्री समितीने केलीय. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा पडला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 07:40 वाजता

शरद पवार आज वाढदिवस साजरा करणार नाहीत

 

Sharad Pawar : शरद पवार आज आपला वाढदिवस साजरा करणार नाहीयत. अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांवरचं संकट आणि आरक्षणाचा मुद्दा या सर्व गोष्टींमुळे शरद पवारांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. आज शरद पवार कुणाच्याही शुभेच्छा स्वीकारणार नाहीत. किंवा कुणाच्याही भेटी घेणार नाहीत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Dec 2023, 07:38 वाजता

हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस गाजणार

 

Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे...आज अवकाळी पाऊस, शेती नुकसान, मराठा आरक्षण आणि मोर्चाने गाजण्याची शक्यताय...अवकाळी पाऊस, शेती नुकसान यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यताय...मुख्यमंत्री शिंदे पीक नुकसान याबाबत मदत जाहीर किती करतात याकडे लक्ष लागलंय...पुरवणी मागणी चर्चा यावर उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देणार आहे. आज पुरवणी मागणी मंजूर करणारे विनियोजन विधेयक मंजूर केले जाईल...तसंच मराठा आरक्षण चर्चा विधानसभेत होणार आहे...मराठा नेते यावर भाषण करणार आहेत...त्याचवेळी छगन भुजबळ हेदेखील बोलणार आहेत...त्यामुळे भुजबळ जरांगे वादावर नेमके सभागृहात काय बोलतात याकडे लक्ष आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा -