Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 16 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

16 Oct 2024, 22:14 वाजता

...गद्दारांना गाडण्याची पवार वेळ आली-  अमोल कोल्हे

 

Amol Kolhe : उठा उठा निवडणूक आली आता गद्दारांना गाडण्याची पवार वेळ आली असं आवाहन अमोल कोल्हेंनी शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत केलंय... त्याचसोबत मुख्यमंत्रिपदाबाबतही अमोल कोल्हेंनी सूचक विधान केलंय. वाळव्याचा माणूस वर्षावर जायची इच्छा आहे असं म्हणत अमोल कोल्हेंनी जयंत पाटील यांच्याबाबत सूचक विधान केलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

16 Oct 2024, 21:23 वाजता

लोकसभेनंतर अमोल कीर्तिकर विधानसभेच्या मैदानात?

 

Amol Kirtikar : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभेच्या मैदानात असणार असल्याचं समजतंय. जोगेश्वरीकरांच्या मनातील आमदार अशी अमोल कीर्तिकरांचे बॅनर ठाकरे गटाच्या पदाधिका-यांकडून झळकवण्यात आलेत. अमोल कीर्तीकर मुंबईत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे पक्षाचे उमेदवार होते. त्यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला होता. शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी त्यांचा निसटता पराभव केला होता. त्यानंतर आता रवींद्र वायकर यांच्या विधानसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

16 Oct 2024, 20:32 वाजता

मुंबईसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला?

 

Mumbai Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचं विधानसभेसाठी मुंबईतील जागावाटपाचं सूत्र ठरल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालीये...ठाकरे पक्षाला मुंबईमध्ये सर्वाधिक 18 जागा मिळणार, काँग्रेसला 14, शरद पवार पक्षाला 2, समाजवादी पक्षाला 1 अशा पद्धतीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...उद्या महाविकास आघाडीची बैठक होणारे आणि त्यानंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे...

16 Oct 2024, 19:58 वाजता

भारतीय न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली

 

Indian god of justice : सुप्रीम कोर्टातील भारतीय न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली... सुप्रीम कोर्ट लायब्ररीमध्ये नवी मूर्ती... न्यायदेवता मूर्तीच्या हाती तलवारीऐवजी संविधान... 

16 Oct 2024, 19:24 वाजता

नागपुरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात तुफान राडा

 

Shyam Manav : नागपुरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात तुफान राडा झालाय...भाजप युवा मोर्च्याचे कार्यकर्ते आक्रमक झालेत..

16 Oct 2024, 18:30 वाजता

आमदार राजेंद्र शिंगणे तुतारी हाती घेणार?

 

Rajendra Shingane : अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांचा बुलढाण्याच्या सिंदखेडराजामध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.. या मेळाव्यात आगामी विधानसभेची निवडणूक तुतारी चिन्हावर लढवण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीये.. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलंय.. त्यामुळे राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांना सोडचिठ्ठी देत लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

16 Oct 2024, 18:06 वाजता

मविआचं मुंबईतील 90% जागावाटप- सूत्र

 

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचं मुंबईतील 90 टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती...महाविकास आघाडीच्या मुंबईतील तीन-चार जागांचा तिढा उद्यापर्यंत सुटणार- सूत्रांची माहिती...महाविकास आघाडीतील ठाकरे पक्ष मुंबईतील सर्वाधिक जागा लढवणार- सूत्र मुंबईमध्ये आज झालेल्या बैठकीत मुंबईतील 36 पैकी 32 जागांवर महाविकास आघाडीतील नेत्यांचं एक मत झाल्याची सूत्रांची माहित

16 Oct 2024, 17:33 वाजता

भाजपची पहिली यादी आज येण्याची शक्यता

 

BJP : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता...झी 24 तासला सूत्रांची माहिती...60 ते 70 उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता आहे...त्यात निवडून येणा-या जागांचाच समावेश असण्याची शक्यता वर्तवली जातेय...त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण आणि गिरीष महाजनांसह इतर मंत्र्यांच्या मतदारसंघांचा समावेश असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

16 Oct 2024, 17:06 वाजता

6 पिकांच्या हमीभावात वाढ

 

Guarantee Price of Crops : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये गव्हाच्या हमीभावात दीडशे रुपये वाढवण्यात आलेत. हरभ-याच्या हमीभावात 210 रुपये, मोहरीसाठी तिनशे रुपये, जवसच्या हमीभावात 130 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर मसुरचा हमीभाव 275 आणि करडईचा हमीभाव 140 रुपयांनी वाढवण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

 

16 Oct 2024, 16:29 वाजता

महायुतीला मोठा धक्का, महादेव जानकर महायुतीतून बाहेर 

 

Mahadev Jankar : महायुतीला मोठा धक्का बसलाय...महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडले आहेत...महायुतीत जानकर नाराज होते    

बातमीचा व्हिडीओ पाहा-