नागपूरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा राडा

Nagpur Shyam Manavs Program: नागपूरात  श्याम मानव यांच्या कार्यक्रमात राडा पाहायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे येथील परिस्थीती तणावाखाली असून पोलिसांना याठिकाणी हस्तक्षेप करावा लागला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Oct 16, 2024, 09:16 PM IST
नागपूरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा राडा title=
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात राडा

Nagpur Shyam Manavs program: नागपूरात  श्याम मानव यांच्या कार्यक्रमात राडा पाहायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे येथील परिस्थीती तणावाखाली असून पोलिसांना याठिकाणी हस्तक्षेप करावा लागला आहे. श्याम मानव हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक आहेत. यांनी 1983 मध्ये भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. तेव्हापासून ते या समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात काम करीत आहेत. 1987 ते 1989 दरम्यान त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरही त्यांच्यासोबतही काम केले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्ते आहेत. गेल्यावर्षी त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांना आव्हान केले होते. जादूटोणा विरोधी कायदा आणण्यात श्याम मानव यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे. 

काय आहे प्रकरण? 

नागपूरमध्ये श्याम मानव यांचा कार्यक्रम होता. संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव या विषयावर ते मांडणी करत होते. दरम्यान भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रवेश केला आणि घोषणाबाजी करुन कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन आंदोलकांना बाहेर काढले. यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरु झाला. आम्ही आंदोलन वैगेरे काही केलं नाही. आम्ही श्याम मानव यांना एक प्रश्न विचारला. 2014 नंतर संविधान बदललंय असा आरोप करताय, असा कोणता निर्णय सरकारने बदलला? अशी प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विचारला. 

हा आंदोलनाचा अपमान

संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव हा कार्यक्रमाचा विषय आहे. याला आंदोलन म्हणणं हा आंदोलन या विषयाचा अपमान आहे. यांना लोकशाहीची मुल्य माहिती नाहीत. माहिती असतील तरी ते ही मुल्य पायदळी तुडवतायत,अशी प्रतिक्रिया श्याम मानव यांनी दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती शिल्लक आहे, याचा हा पुरावा आहे. यांना संविधान,अभिव्यक्ती मान्य नाही, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दिली.

काय म्हणाले श्याम मानव?

आपल्या देशामध्ये हिंदूंचं राज्य आहे. 80 टक्के लोक हिंदू आहेत. आजवरचे देशातील सर्व पंतप्रधान हिंदू राहिले आहे.आमच्याच देशात सातत्याने हिंदूंचं राज्य राहिलं आहे. त्यामुळे यांना वेगळे हिंदू राष्ट्र का आणायचं आहे? असा प्रश्न श्याम मानव यांनी विचारला.
धीरेंद्र शास्त्री नागपुरात येऊन अंधश्रद्धा पसरवत असताना मी पोलिसांना तक्रार केली होती... अनेक दिवस पोलिसांनी तपास करून धिरेंद्र शास्त्री प्रकरनी जादूटोणा विरोधी कायदा लागू होत नाही असा निर्वाळा दिला. जो पोलीस देवाभाऊसाठी काम करत कायदा लागू करत नाही, त्यामुळे या स्थितीवर उपाय करायचे असेल, तर देवा भाऊलाच घालवायची गरज आहे.म्हणून त्यांचा विरोध करणे आवश्यक आहे, म्हणून हे प्रयत्न सुरू केल्याचे ते म्हणाले.

जे भिडे गुरुजी महात्मा गांधी आणि त्यांच्या आईबद्दल एवढे घाणेरडे आरोप करतात, त्या भिडेंना देवेंद्र फडणवीस गुरुजी म्हणतात, त्या देवाभाऊला घरी पाठवायचे आहे. OBC महासंघ फडणवीस यांचं समर्थन कस करू शकतो. देवाभाऊंना तुकारामचा ड्रेस चढवला. हा तुकाराम महाराजांचा अपमान असल्याचे ते म्हणाले. 

निवडणूक जाहीर झालेली आहे, आचारसंहिता लागलेली आहे, आणि हे उघडरित्या विचार मांडण्यावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन आणू पाहत आहेत.पुन्हा यांचं सरकार आलं तर आपल्या अनेक प्रकारच्या स्वातंत्र्यांवर गदा येणार असल्याचे ते म्हणाले.