Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 16 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

16 Oct 2024, 16:14 वाजता

शरद पवार पक्षाची पहिली यादी शुक्रवारी?

 

Sharad Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत 50 उमेदरांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार असल्याचं समजतंय. तर उर्वरित जागांवर आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा झाल्यानंतर दुसरी यादी जाहीर केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

16 Oct 2024, 15:53 वाजता

'महायुतीत कुणालाही डोहाळे लागले नाही', मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

 

Eknath Shinde : मुख्यमंत्री पदाच्या चेह-यावरुन उद्धव ठाकरेंनी केलेल्या आव्हानाला आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय.. आधी शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा असं आव्हान फडणवीसांनी केलंय.. तर महायुतीमध्ये कुणालाही मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले नाहीत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

16 Oct 2024, 15:29 वाजता

'महायुतीचं रिपोर्ट नाही डिपोर्ट कार्ड',आदित्य ठाकरेंची टीका

 

Aditya Thackeray On Mahayuti Deport Card : महायुतीचं रिपोर्ट नाही डिपोर्ट कार्ड...महायुतीच्या रिपोर्ट कार्डवर ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केलीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

16 Oct 2024, 14:25 वाजता

टोलमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

 

Sanjay Raut Vs Raj Thackeray : टोलमाफीच्या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय.. टोल माफीचा निर्णय हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय.. तर निवडणुका डोळ्यासमोर घेऊन टोलमाफीचा निर्णय घेतला असेल तर तसं करु देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय.. 

16 Oct 2024, 13:55 वाजता

जनता पुन्हा महायुतीला साथ देणार - शिंदे

 

Mahayuti Press Conference : अडीच वर्षात जनतेच्या प्रगतीसाठी काम केलंय त्यामुळे जनता महायुतीला पुन्हा साथ देणार असल्याचा विश्वास शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी व्यक्त केलाय.. गेल्या अडीच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून महायुतीनं जनतेसमोर ठेवलाय... महायुतीनं सुरू केलेल्या योजना मविआ बंद करणार आहे. त्यामुळे चांगल्या योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नसल्याचं शिंदे म्हणालेत.. तसेच लाडकी बहीण योजनेला टच केल्यास तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचा इशाराही एकनाथ शिंदेंनी दिलाय.. 

16 Oct 2024, 13:18 वाजता

'लाडक्या बहिणी'वरुन रणकंदन

 

Ladki Bahin Yojana : केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लाडकी बहीण योजना  सुरु केली असून या या योजनेमुळे राज्य कंगाल होईल अशी टीका राज ठाकरेंनी केलीये.. दरम्यान ही योजना बंद होऊ देणार नसल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय.. तर या योजनेला टच केलात तर लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय... 

16 Oct 2024, 12:26 वाजता

दिल्लीत भाजप आणि काँग्रेसची महत्त्वाची बैठक

 

Maharashtra Vidhansabha Election : राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तिकडे दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलाय.. दिल्लीत एकीकडे भाजप तर दुसरीकडे काँग्रेसची बैठक आज पार पडणारेय. भाजपच्या विधानसभेच्या  उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.. मोदी, शाह आणि जेपी नड्डांच्या उपस्थितीत दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे आज काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक पार पडणार आहे.. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.. राज्यातील प्रमुख नेते दिल्लीत जाणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Oct 2024, 11:58 वाजता

मुंबई-बंगळुरु महामार्गावर कार अडवून 3 कोटींची लूट

 

Satara : साता-यात मुंबई-बंगळुरु महामार्गावर एका कारमधून तीन कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आलीये. ही कार मुंबई ते बंगळुरु असा प्रवास करत असताना कराड येथील ढेबेवाडी फाट्याजवळ 6 आरोपींनी कार अडवली.. कार चालकाला रिव्हॉल्वर आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार केली.. आरोपींनी या गाडीतील तीन कोटी रूपये घेऊन मुंबईच्या दिशेनं पळ काढला... ही रक्कम हवालाचे असल्याचे समोर आले आहे... या प्रकरणी कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलिसांनी याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतलंय.. गाडीत पैसे असल्याची माहिती केवळ हवाला कंपनीतील अधिका-यांनाच माहिती होतं.. त्यामुळे पोलिसांनी कंपनीच्या अधिका-यांचीही चौकशी सुरु केलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Oct 2024, 11:51 वाजता

काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होणार?

 

Congress First List : काँग्रेसची पहिली उमेदवार यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.. पहिल्या यादीत 35 उमेदवारांचा समावेश असेल अशी माहिती सूत्रांनी दिलीये.. दिल्लीत आज काँग्रेसच्या स्किनिंग कमिटीची बैठक होणार आहे.. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Oct 2024, 11:11 वाजता

अंधेरीत लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

 

Andheri Fire : अंधेरीतल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या भीषण आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झालाय.. रिया पॅलेस या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर ही आग लागली होती.. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.. या आगीतील तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -