Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 16 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

16 Oct 2024, 10:56 वाजता

रत्नागिरी,सिंधुदुर्गात मविआमध्ये ठाकरेंना झुकतं माप?

 

Maharashtra Vidhansabha Election : कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना झुकतं माप मिळणारेय.  दोन्ही जिल्ह्यातील आठ पैकी सहा जागांवर उद्धव ठाकरेंचे शिलेदार लढणार असल्याची माहिती मिळतेय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळणार असल्याची माहिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चार जागा उद्धव ठाकरेंकडे तर एक जागा शरद पवार यांच्याकडे जाणारेय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन पैकी दोन जागा उद्धव ठाकरेंकडे तर एक जागा शरद पवार यांच्याकडे जाणारेय.  दोन्ही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याची माहिती मिळतेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Oct 2024, 10:14 वाजता

आमदार सतीश चव्हाणांचा महायुतीला घरचा आहेर

 

Satish Chavan : अजित पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय. प्रसिध्दी पत्रक काढत त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर सवाल उपस्थित केलेत.गेल्या  अडीच वर्षात महायुती सरकारने बहुजन समाजाला न्याय दिला नाही, सर्वच समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही अशी टीका त्यांनी सरकार वर केलीय. त्यामुळे लवकरच सतीश चव्हाण हे अजित पवार गटाला निरोप देत शरद पवारांना जवळ करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Oct 2024, 09:47 वाजता

परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली

 

Ratnagiri : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळलीये.. चिपळूण जवळील परशुराम घाटात ही घटना घडलीये. यामुळे मुंबई गोवा माहामार्गावरुन एक मार्गीका बंद करण्यात आली असून एकाच लेनवरुन वाहतूक सुरु आहे.. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाची पुन्हा पोलखोल झालीये... गेल्या दोन ते तीन वर्ष परशुराम घाट पूर्णपणे खोदून महामार्ग तयार करण्या आला होता. मात्र या घाटात दरड कोसळणं, डोंगर खचणं अशा घटना सुरुच आहेत... त्यामुळे घाटातील बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Oct 2024, 09:36 वाजता

अकोटच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच

 

Amol Mithkari : अकोटच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच होणार असल्याची माहिती आहे.. अकोला जिल्ह्यातील अकोट मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केलीय.. अकोट मतदार संघात चांगलं काम केलंय.. कामाच्या जोरावर जनता आपल्याला विजयी करतील त्यामुळे पक्षानं  अकोटची जागा द्यावी अशी मागणी अमोल मिटकरींनी केलीय.. त्यांच्या या मागणीमुळे आता महायुतीत घुसफुस दिसून येत आहेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Oct 2024, 08:55 वाजता

Pune Bopdev Case Update : पुण्यातील बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी दारू आणि गांजाचं सेवन केल्याची माहिती मिळतेय. तसंच  तांत्रिक तपासात अडथळे आणण्यासाठी आरोपींनी त्यांचे मोबाइल फ्लाईट मोडवर ठेवल्याची माहिती तपासात मिळालीय. याप्रकरणात आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तर तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Oct 2024, 08:32 वाजता

साताऱ्यात महायुतीत रस्सीखेच

 

Satara : आचारसंहिता लागू होताच साता-यातील वाई मतदारसंघात महायुतीमध्ये  रस्सीखेच सुरू झालीये...शिवसेनेच्या शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी वाई मतदारसंघातून बंडाचा झेंडा फडकवलाय...काहीही झाले तरी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात उमेदवारी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केलंय...यासाठी त्यांनी गेल्या 15 दिवसांपासून जन संवाद यात्रा काढून लोकांशी संवाद साधतायत...दरम्यान तुतारी हाती घ्यावी लागली तरी घेईन असे संकेत त्यांनी दिलेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Oct 2024, 08:20 वाजता

एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

 

Eknath Khadse : विरोधकांना जास्त वेळ मिळू नये म्हणून एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची सरकारची शिफारस  होती अशी टीका एकनाथ खडसे यांनी सरकारवर केलीय. दरवेळी विधानसभेच्या निवडणुका या तीन टप्प्यात किंवा पाच टप्प्यात होतात मात्र आताची विधानसभा निवडणूक फक्त एक टप्प्यात पार पाडली जातेय. जर निवडणुका टप्प्याटप्प्याने पार पाडल्या तर विरोधकांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळतो त्यामुळे वातावरण हे सरकार विरोधी तयार होण्याची भीती असते. त्यामुळे या भीतीपोटी सरकारने एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची शिफारस केलेली दिसते आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Oct 2024, 08:12 वाजता

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मान्सूनची माघार

 

Rain Alert : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मान्सूननं माघार घेतलीये... यंदा अपेक्षित वेळेत मान्सून माघारी परतल्याची माहिती हवामान विभागानं दिलीये...पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्याच्या उत्तर भागातून परतीचा प्रवास सुरू झाला होता. दरम्यान बंगालच्या उपसागरात दक्षिण भागात  कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय.. त्यामुळे किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता  वर्तवण्यता आलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Oct 2024, 07:51 वाजता

रुपाली चाकणकर पुन्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी

 

Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आलीये.. चाकणकर यांना पुन्हा तीन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्यात आलाय.. महिला आणि बाल विकास विभागाकडून तसा आदेश जारी करण्यात आलाय..