30 Oct 2024, 11:13 वाजता
सुहास कांदेंवर नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल
Nandgaon Suhas Kande : नांदगाव पोलिसात सुहास कांदे यांच्यावर शिवीगाळ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय..अर्ज भरताना विरोधात बोलणा-यांवर शिवीगाळ करून धमकी दिली होती...सुहास कांदेंविरोधात नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल केलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Oct 2024, 11:09 वाजता
30 Oct 2024, 10:40 वाजता
उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये भीषण आग
Ulhasnagar Fire : उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये भीषण आग लागलीय. ऐन दिवाळीत कपड्याच्या दुकानाला आग लागल्यानं दुकानदाराचं नुकसान झालं आहे. जवळच फटाका मार्केट असल्यानं धोका आहे. उल्हासनगर, कल्याण अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.
30 Oct 2024, 09:52 वाजता
मुंबई शहर आणि उपनगरांत 618 उमेदवारांचे 778 अर्ज
Maharashtra Election 2024 : मुंबई शहर आणि उपनगरात एकूण 618 उमेदवारांनी 778 अर्ज दाखल केलेत.. यात अणुशक्तीनगर मतदारसंघात सर्वाधिक 37 उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत.. दिंडोशी मतदारसंघात 32, मानखुर्द शिवाजीनगर 29, चांदिवली 27, जोगेश्वरी 25 आणि मुंबईतल्या उतार मतदारसंघात दाखल झालेल्या अर्जाची संख्या 20 च्या आसपास आहे... 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Oct 2024, 09:36 वाजता
मावळमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढलीय
Maharashtra Election 2024 : मावळमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढलीय.. कारण बापू भेगडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. त्यांच्या उमेदवारीमुळे सुनील शेळके यांचं टेन्शन वाढलंय.. फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत बाळा भेगडे यांनी महायुतीच्या उमेदवाराला साथ देण्याचं मान्य केलं होतं. अशी माहिती सुनील शेळकेंनी दिलीय...मात्र बाळा भेगडे यांनी शब्द पाळला नसल्याचं शेळके म्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Oct 2024, 08:51 वाजता
संभाजीनगर शहरावर ड्रोनची नजर
Maharashtra Election 2024 : संभाजीनगर शहरावर पुढील काही दिवस ड्रोनची नजर असणार आहे.. विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ यासाठी संभाजीनगरमधील पोलीस प्रशासन सज्ज झालंय.. शासकीय कार्यालयं, हॉटेल आणि मार्केटवर ड्रोनची नजर असणार आहे.. शहरातील संवेदनशील ठिकाणीही ड्रोनची नजर असणार आहे.. तसेच पोलिसांचं खास पथकही अनुचित प्रकार रोखण्यासाठी काम करणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Oct 2024, 08:41 वाजता
सहमतीनं घटस्फोटासाठी कुलिंग कालावधी नको-हायकोर्ट
Mumbai High Court On Divorce : सहमतीने घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांसाठी कुलिंग कालावधीची अट ठेवू नका.. अशी महत्त्वीची सूचना उच्च न्यायालयान कौटुंबिक न्यायालयाला केलीय.. परस्पर संमतीने विभक्त होऊ पाहणाऱ्या जोडप्यांना घटस्फोट मंजूर करण्यापूर्वी सहा महिने कुलिंग कालावधी देण्यात येतोय.. मात्र तशी अट घालू नका असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय.. त्यामुळे सहमतीनं घटस्फोट घेणा-यांची मानसिक त्रासातून सुटका होणार आहे.. तसेच घटस्फोटाच्या प्रक्रियेला गती मिळणार असल्याचं मुंबई हायकोर्टाचं म्हणणं आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Oct 2024, 08:21 वाजता
निवडणूक कालावधीत 4 दिवस मद्यविक्री बंद
Maharashtra Election 2024 : निवडणूक कालावधीत 4 दिवसांसाठी मद्यविक्री बंद असणार आहे... 18 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्यात येणारेय... त्याचबरोबर 23 नोव्हेंबरला मतमोजणीच्या दिवशी ही मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे..... तसेच या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करुन त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येणार आहे.. तसा इशारा सरकारकडून देण्यात आलाय..
30 Oct 2024, 08:16 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: अर्ज भरण्याचा काल होता शेवटचा दिवस
अखेरच्या दिवसापर्यंत मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात एकूण 618 उमेदवारांनी 778 अर्ज भरले आहेत. मुंबईत अणुशक्तीनगर मतदारसंघात सर्वाधिक 37 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दिंडोशी मतदारसंघात 32, मानखुर्द शिवाजीनगर 29, चांदिवली 27, जोगेश्वरी 25 आणि मुंबईतल्या उतार मतदारसंघात दाखल झालेल्या अर्जाची संख्या 20 च्या आसपास आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटाची तारीख 4 नोव्हेंबर आहे. अखेरच्या दिवसापर्यंत या आकड्यांमध्ये घट होणार का? हे पाहणं महत्त्वाचे असेल
30 Oct 2024, 08:01 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: निवडणूक कालावधीत चार दिवस मद्य विक्री बंद
जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक कालावधीत म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यत. तसेच २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जारी केले आहेत.या आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल, तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.