30 Oct 2024, 20:45 वाजता
'सिंचन प्रकरणात माझी चूक नव्हती', झी २४ तासकडे पृथ्वीराज चव्हाणांचं मनोगत
Prithviraj Chavan on Sinchan Scam : राज्याचं राजकारण ढवळून निघालेली बातमी आता आपण पाहणार आहोत...सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे आपल्याला न्याय मिळाला असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. झी २४ तासच्या विशेष कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. सिंचन प्रकरणात आपली काही चूक नव्हती. राजकीयदृष्ट्या आपल्या सरकारला फासावर लटकवलं गेलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली. तसंच विनाकारण आपला राजकीय बळी दिला गेल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. सिंचनाच्या आरोपांमुळे नंतर भाजप सरकार सत्तेत आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे आपल्यावर ठेवण्यात आलेल्या ठपक्यातून आपली सुटका झाल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. सिंचन प्रकरणाबबतची चौकशी आपण लावल्याचा गैरसमज पसरवण्यात आला होता. त्या गैरसमजातून आपली मुक्तता झाल्याचं समाधान, झी २४ तासवरील विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
30 Oct 2024, 19:10 वाजता
आर. आर. आबांना कुणी त्रास दिला हे माहिती- रोहित पाटील
Rohit Patil on Ajit Pawar : गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना आर आर आबांना कुणी त्रास दिला हे माहिती आहे.. यावर योग्य वेळी योग्य उत्तर देणार, असं म्हणत रोहित पाटील यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.. आर आर आबांच्या अनेक मित्रांनी याबाबत मला सांगितलंय.. मात्र, योग्य वेळी उत्तर देण्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ते तासगावच्या ढवळी येथील प्रचार सभेत बोलत होते...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
30 Oct 2024, 16:48 वाजता
काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Congress : काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर...सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगेंचा समावेश....कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याही करणार प्रचार..तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीही प्रचार करणार...महाराष्ट्रातून नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह मोठ्या नेत्यांची नावं
30 Oct 2024, 16:12 वाजता
'दादांचे आबांवरील आरोप दु:खद', स्मिता पाटील यांची प्रतिक्रिया
Smita Patil on Ajit Pawar : आबा गेल्यानंतर ज्यांनी आमचं पालकत्व स्वीकारलं, ज्यांना आम्ही वडिलांच्या जागी पाहिलं, त्या अजित पवारांनी आर आर पाटलांवर असे आरोप करणे दुःखदायक असल्याची भावना, आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी व्यक्त केली. सिंचन घोटाळा प्रकरणातील या आरोपांमुळे कुटुंबीयांसह आबाप्रेमींना मोठं दुःख झालं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
30 Oct 2024, 14:04 वाजता
सिंचन घोटाळ्याची फाईल काँग्रेस-एनसीपीनं उघडली- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्याची फाईल काँग्रेस-एनसीपीनं उघडली...देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा...घोटाळ्याची चौकशी आघाडी सरकारनंच लावली..अजितदादांच्या दाव्याला फडणवीसांची पुष्टी
30 Oct 2024, 13:19 वाजता
अकोल्यात मनसे उमेदवाराचा अर्ज बाद
Maharashtra Election 2024 : अकोला जिल्ह्यातील मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झालाय. अकोला पश्चिम मतदार संघातून मनसे उमेदवार प्रशंसा आंबेरे यांनींचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता... विधानसभेच्या निवडणुकीकरिता बाद करण्यात आलाय...निवडणूक आयोगाने 25 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची अट दिली आहेय.. मात्र प्रशंसा अंबेरे यांच वय 25 वर्षा पेक्षा कमी आहे.. त्यामुळे अर्जाच्या छाननी दरम्यान बाद करण्यात आला आहेय..मनसे उमेदवार यांना 25 वर्ष पूर्ण करण्याकरिता 24 दिवसांचा अवधी बाकी असल्याचं कारण देत त्यांचा अर्ज बाद करण्यात आलाय
बातमीचा पाहा - राज ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का! प्रत्यक्ष निवडणुकीआधीच...
30 Oct 2024, 12:45 वाजता
मविआतील बंडखोरी शमवण्यात येईल - संजय राऊत
Maharashtra Election 2024 : मविआतील बंडखोरी शमवण्यात येईल असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय.. रोहीत पाटलांनाही सागंली पॅटर्नचा सामना करावा लागेल असं ते म्हणालेत.. शेकापसाठी जागा सोडण्यास तयार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली..
30 Oct 2024, 12:14 वाजता
मविआत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही - रमेश चेन्नीथला
Maharashtra Election 2024 : मविआत मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचं मोठं विधान काँग्रेसचे रमेश चेन्नीथला यांनी म्हटलय.. तसेच आमच्या पक्षाकडून झालेली बंडखोरी आम्ही परत घ्यायला लावू असंही त्यांनी स्पष्ट केलंय... यावेळी त्यांनी महायुतीचं सरकार जाणार असून मविआचं नवं सरकार राज्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय..
30 Oct 2024, 12:13 वाजता
महायुतीत बंडखोरांचं टेन्शन
Maharashtra Election 2024 : विधानसभेत तिकीट न मिळाल्यानं भाजप आणि शिंदेंचं टेन्शन वाढलंय.. कारण ज्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत . त्यातील काही ठिकाणी भाजपच्या इच्छुक उमेदवारींनी बंडखोरी केल्याचं समोर आलंय.. बुलढाणा विधानसभेसाठी संजय गायकवाड यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवार मिळालीय.. मात्र तिथे भाजपच्या विजयराज शिंदेंनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. जालन्या अर्जुन खोतकरांविरोधात भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय..
30 Oct 2024, 11:24 वाजता
रामटेकमध्ये मविआची डोकेदुखी वाढली
Maharashtra Election 2024 : रामटेक विधानसभा मतदारसंघात मविआची डोकेदुखी वाढली.. कारण काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मूळक यांनी बंडखोरी केलीय.. त्यांच्या बंडखोरीला स्थानिक नेत्यांनी उघडपणे समर्थन दिलंय.. त्यांच्या रॅलीत सुनिल केदार सहभागी झाल्याचं पाहाला मिळालंय.. त्यामुळे मविआचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांचं टेन्शन वाढणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -