30 Oct 2024, 07:59 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: सर्वाधिक बंडखोर उमेदवारांची संख्या ही महायुतीत
अकोला जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे ते म्हणजे नाराज इच्छुक उमेदवारांच्या नामांकन अर्ज दाखल करण्याने.यामध्ये सर्वाधिक बंडखोर उमेदवारांची संख्या ही महायुतीत आहेत. सर्वाधिक आऊट गोईंग भाजपमध्ये असून सर्वाधिक इन कमिंग प्रहार पक्षात आहे. काल पर्यंत मोठी ताकद नसलेल्या तिसरी आघाडीला नाराज इच्छुकांमुळे आता बळ आला आहेय.
30 Oct 2024, 07:58 वाजता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: ...तर उमेदवारी अर्ज मागे घेईल सुनील शेळकेंचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना खुले आव्हान
मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपण दिलेल्या माहितीतील एक शब्द जरी खोटा असेल, तर मी उमेदवारी अर्ज मागे घेईन, असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळचे महायुती उमेदवार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात दोन दिवसांपूर्वी मावळमधील महायुती चा तेढ सोडवण्यासाठी चर्चा झाली. मात्र ती चर्चा निष्फळ ठरत दुसऱ्या दिवशीच बाळा भेगडे यांनी बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या व्यासपीठावर हजेरी लावली.
30 Oct 2024, 07:46 वाजता
सिंचन प्रकरणात चौकशी लावली नव्हती - पृथ्वीराज चव्हाण
Satara Prithviraj Chavan : सिंचन प्रकरणी कोणतीही चौकशी लावली नव्हती.. नाहक माझा बळी घेतला गेला असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.. सिंचन घोटाळ्याची फाईल आपल्याकडे आली नाही आणि आपण त्यावर सही केली नसल्याचंही चव्हाण म्हणालेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Oct 2024, 07:42 वाजता
श्रीनिवास वनगांचा अखेर कुटुंबाशी संपर्क
Palghar Shrinivas Vanaga : अखेर तब्बल 36 त्यानंतर पालघर चे आमदार श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाल्याचे समजते . पहाटे श्री निवास वनगा हे घरी येऊन कुटुंबीयांना भेटून पुन्हा दोन दिवस बाहेर गेले असल्याचं त्याच्या पत्नी सुमन वनगा यांनी सांगितले. आपल्याला आरामाची गरज असल्याचं कारण सांगत, श्रीनिवास पुन्हा बाहेर गावी जात असल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळे आता वनगा कुटुंबीयांची चिंता मिटलेली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Oct 2024, 07:39 वाजता
बंडोबांना थंड करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न
Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीत यंदा अनेक बंडखोर असल्याचं पाहायला मिळतंय. या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी महायुतीनं प्रयत्न सुरु केल्याचं समजतंय. महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते बंडखोरांना थंड करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात याबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. बंडखोरीचा महायुतीला फटका बसू नये यासाठी तिन्ही नेत्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरु असल्याचं कळतंय. त्याचाच भाग म्हणून आज रात्री उशिरा तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे.