Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील व दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राजकीय घडामोडींच्या दृष्टीने आजचा दिवस महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. नेमकं आज काय घडणार? दिवसभरातील सर्वच घडामोडींचा घेतलेला धावता आढावा या ठिकाणी पाहता येईल...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील व दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार

4 Dec 2024, 12:31 वाजता

मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव घोषित पुढे काय?

विधीमंडळ पक्षाचा नेता भाजपकडून घोषीत झाल्यानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेत्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महायुतीचे 3 प्रमुख नेते म्हणजेच एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकत्रच राज्यपालांकडे जाण्याची शक्यता आहे. 2 वाजता अजित पवार दिल्लीहून मुंबईत पोहोचतील अशी माहिती समोर येत आहे. दुपारी साडेतीन वाजता हे तिन्ही नेते राज्यपालांची भेट घेणार आहे. साडेतीन वाजताची वेळ ही राज्यपालांच्या भेटीसाठी नियोजित केली आहे.

4 Dec 2024, 12:14 वाजता

अशी झाली फडणवीसांच्या नावाची निवड

कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा गटनेता म्हणून प्रस्ताव निश्चित करण्यात आल्यानंतर तो भाजपाच्या विधीमंडळ सदस्यांसमोर म्हणजेच नवनिर्वाचित आमदारांसमोर ठेवण्यात आला. या प्रस्तावाला आशिष शेलार, पंकजा मुंडेंसहीत भाजपाच्या अनेक नेत्यांनी अनुमोदन देत फडणवीसांचं अभिनंदन केलं. प्रस्तावाला अनुमोदन दिलं. त्यानंतर आमदारांनी आपला पाठिंबा दर्शवल्यानंतर फडणवीसांचं नाव गटनेते पदी निश्चित झालं.

4 Dec 2024, 12:04 वाजता

महाराष्ट्रात पुढील 5 वर्ष फडणवीस पर्वच... BJP कडून शिक्कामोर्तब!

भाजपाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांची गटनेता पदी नियुक्ती झाली आहे. विधीमंडळातील सर्वात मोठ्या पक्षाचा गटनेता हाच बहुमत असल्यास मुख्यमंत्री होतो. त्यामुळे फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झालं आहे. भाजपाच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. फडणवीसांची बिनविरोध निवड झाली आहे.

4 Dec 2024, 12:03 वाजता

'हमारा नेता कैसा हो?' 'देवेंद्र फडणवीस जैसा हो'च्या घोषणा

भाजपाच्या आमदारांकडून विधीमंडळ पक्ष बैठकीमध्ये 'हमारा नेता कैसा हो?' 'देवेंद्र फडणवीस जैसा हो'च्या घोषणा दिल्या.

4 Dec 2024, 11:57 वाजता

विधीमंडळ गटनेता पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव

विधीमंडळ गटनेता पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वच आमदारांनी जल्लोष केला. पंकजा मुंडे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं.

4 Dec 2024, 11:46 वाजता

उद्या मुंबईत शपथविधी सोहळा, जय्यत तयारी! आझाद मैदान परिसरात 5 हजार पोलीस तैनात

उद्या म्हणजेच 5 डिसेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेसमोरील आझाद मैदानामध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून भाजपा नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे समजते. आझाद मैदान परिसरामध्ये 5 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

4 Dec 2024, 11:16 वाजता

भाजपाचं ठरलं... फडणवीसांना गटनेता करण्याचा प्रस्ताव; चंद्रकांत पाटील...

गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावार भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आता हा प्रस्ताव विधिमंडळ बैठकीमध्ये मांडला जाणार आहे. चंद्रकांत पाटील हा प्रस्ताव मांडणार असून सुधीर मुनगंटीवार, रविंद्र चव्हाण, आशिष शेलार या प्रस्तावाला अनुमोदन करणार आहेत.

4 Dec 2024, 11:06 वाजता

विधानसभवनात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक संपली; थोड्याच वेळात जाहीर होणार नव्या मुख्यमंत्र्याचं नाव

विधानसभवनात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक संपली आहे. जवळपास अर्धा तास ही बैठक सुरु होती. यानंतर भाजपाच्या विधानसभा पक्षाची बैठक होणार असून यामध्ये गटनेता निवडला जाणार आहे.

4 Dec 2024, 10:59 वाजता

PUBG खेळत असताना पाठीमागून वार; पुण्यात अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलाची हत्या

पुण्यात अल्पवयीन आरोपींकडून गुन्हेगारीचे सत्र सुरूच असल्याचं चित्र दिसत आहे. अल्पवयीन आरोपीने अल्पवयीन मुलाचा धार धार शस्त्राने वार करत खून केला आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी आणि मृत मुलामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत नंबरवरून वाद झाला होता. मुलगा पब्जी खेळत असताना पाठीमागून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

4 Dec 2024, 10:54 वाजता

पक्ष विरोधी कार्यवाही केल्याचा आरोप असलेला 'तो' नेताही बैठकीत सहभागी

रणजीत सिंह मोहिते पाटील भाजपाच्या बैठकीसाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्ष विरोधी कार्यवाही केल्याचा आरोप केला होता.