4 Dec 2024, 15:53 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचा पाठिंबा - एकनाथ शिंदे
4 Dec 2024, 15:49 वाजता
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद -
"आम्ही महायुतीच्या वतीने राज्यपालांना पत्र दिलं आहे. राज्यात नवं मंत्रिमंडळ स्थापन कऱण्यासाठी दावा केला आहे. राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंतर आम्हाला 5 तारखेला संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधीची वेळ नेमून दिली आहे. आज भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, जनस्वराज्य, युवा स्वाभिमान, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती झालेली आहे. या सगळ्यांच्या सहीचं पत्र दिलं आहे," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
"मी शिवसेनेचे अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानते. त्यांनी शिवसेनेच्या वतीने माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. तसंच राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार यांनीही त्याच आशयाचं पत्र दिलं आहे. आमच्या मित्रपक्षांनीही तशाच प्रकारची विनंती केली आहे. सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून राज्यपालांनी निमंत्रित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या 5.30 वाजता आझाद मैदानात हा सोहळा पार पडला जाणार आहे. तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित असतील," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
बातमीची लिंक - https://zeenews.india.com/marathi/maharashtra/mahayuti-government-eknath...
4 Dec 2024, 15:46 वाजता
Mahayuti Press Conference : राज्यपालांकडे जाऊन महायुतीने सत्तास्थापनेचा दावा केला. उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी स्विकारलं की नाही, याबद्दल सस्पेन्स कायम आहे. कारण महायुतीच्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, एकनाथ शिंदे सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली.
बातमी सविस्तर वाचा - Mahayuti Press Conference: मी एकनाथ शिंदेंना विनंती केली आहे; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4 Dec 2024, 15:26 वाजता
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यपालांकडून महायुतीला सत्तास्थापनेचं आमंत्रण
4 Dec 2024, 15:04 वाजता
महायुती सत्तास्थापनेचा दावा करणार, तिन्ही नेते राजभवनाच्या दिशेने रवाना
4 Dec 2024, 14:53 वाजता
देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ अजित पवारही वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.
4 Dec 2024, 14:42 वाजता
फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल
4 Dec 2024, 13:53 वाजता
फडणवीस मुख्यमंत्री होणार निश्चित होताच; नाशिकमध्ये मोठ्या राड्याचे संकेत?
भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर होतात नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. या आनंद उत्सवात भाजप पदाधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मुख्यमंत्री असा बॅनर घेऊन आनंद साजरा केला गेला. तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री असं बॅनर देखील फडणवीसांच्या नावासहीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून दाखवण्यात आलं. त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील तीनही पक्षांकडून दावे केले जात आहेत. त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्री पदावरूनही संघर्ष महायुतीत पाहायला मिळणार असे चित्र सध्यातरी समोर येत आहे.
4 Dec 2024, 13:20 वाजता
फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यानंतर शिंदेंचे नेते घेणार त्यांची भेट
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शुभेछा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. विधिमंडळ गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यामुळे त्यांना भेटून शुभेच्छा देणार आहेत. उदय सामंत, अर्जुन खोतकर, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, किशोर आप्पा पाटील आणि इतर नेते भेटून शुभेच्छा देणार आहेत.
4 Dec 2024, 13:20 वाजता
दुपारी 2 वाजता फडणवीस, शिंदे, अजित पवार भेटणार आणि...
दुपारी 2 वाजता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. वर्षा निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. या बैठकीला अजित पवारसुद्धा उपस्थित राहणार आहेत. पुढील सर्व प्रक्रिया, मंत्रिपदं, कोण शपथ घेणार याबाबत तिन्ही नेते चर्चा करणार आहेत.