4 Dec 2024, 07:01 वाजता
भाजपाचे केंद्रीय निरीक्षक घेणार महायुतीच्या तिन्ही नेत्यांची भेट
भाजपचे केंद्रीय निरीक्षक बैठकीनंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4 Dec 2024, 06:56 वाजता
सरकार स्थापनेसाठी भाजपाच्या हलचालींना वेग
विधिमंडळ गटनेता निवड होण्याआधी भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटी बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर सकाळी सेंट्रल हॉल, विधानभवन येथे भाजप आमदारांची बैठक होईल, या बैठकीत नव्या सरकारच्या स्थापनेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.