4 Dec 2024, 10:44 वाजता
विधानसभवनात भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात; फडणवीसही उपस्थित
विधानसभवनात भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीनंतर होणाऱ्या विधीमंडळाच्या भाजपाच्या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित असणार आहेत. या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे. कोअर कमिटीच्या बैठकीला फडणवीसही उपस्थित आहेत.
4 Dec 2024, 10:43 वाजता
'देवा भाऊ आपले मुख्यमंत्री'; मुंबईत बॅनरबाजी
भाजपाचे केंद्रीय निरिक्षक थांबलेल्या ताज प्रेसीडंट हॉटेलबाहेर, 'देवा भाऊ आपले मुख्यमंत्री' अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असणार असा विश्वास बॅनरमधून व्यक्त करण्यात आला आहे. भाजप गटनेता निवडीची बैठक होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री असा उल्लेख केला जात आहे.
4 Dec 2024, 10:38 वाजता
राज्याची कशी लूट होईल याचा ट्रेलर आम्ही 8 दिवसांपासून...; संजय राऊतांचा टोला
महाराष्ट्रात सरकार स्थापना हा खेळखंडोबा होऊन बसला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. इतकं प्रचंड बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं आहे मात्र मुख्यमंत्री पदासाठी काँटे की टक्कर सुरू आहे. बहुमत मिळून भाजप वेळेवर सरकार स्थापन करू शकत नाही. अंतर्गत कुरघोडीमुळे भाजपला हे कठीण जात आहे तर सरकार चालवताना काय? राज्याची कशी लूट होईल याचा ट्रेलर आम्ही 8 दिवसांपासून पाहत आहोत, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
4 Dec 2024, 10:38 वाजता
भाजपाचा विजय झाल्यापासून मराठी माणसांवर हल्ले सुरु; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा विजय झाल्यापासून मराठी माणसांवर हल्ले सुरू झाले आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मराठी बोलू नका, मारवाडी गुजराती बोला अशा धमक्या देत आहेत. मराठी माणसाला उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्या फडणवीस यांच्या आजूबाजूचे उपरे देत आहेत. राज्यात सुरु असलेल हे चित्र अत्यंत गंभीर आहे. मुंबई मराठी माणसांच्या रक्तातून तयार झाली आहे. आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत आहोत मराठी खपवून घेतल जात नाही अशा धमक्या दिल्या जात आहेत, असं राऊत म्हणालेत.
4 Dec 2024, 10:26 वाजता
फेटे बांधून भाजपा आमदारांचं विधानभवनात स्वागत; फडणवीसही दाखल
देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून विधानभवनात दाखल. आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षनेता निवडला जाणार आहे. फेटे बांधून भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांचं स्वागत करण्यात आलं आहे.
4 Dec 2024, 10:25 वाजता
भाजपाचे निरीक्षक विधानसभेकडे रवाना
भाजपचे निरीक्षक विजय रूपाणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ताज प्रेसिडेंट हॉटेलमधून विधानभवनाच्या दिशेने रवाना
4 Dec 2024, 09:37 वाजता
गोल्डन टेम्पलच्या गेटवर माजी उपमुख्यमंत्र्यांवर गोळीबार
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तसेच शिरोमणी अकाली दल पक्षाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गोल्डन टेम्पच्या प्रवेशद्वारावर हा हल्ला करण्यात आला.
4 Dec 2024, 08:48 वाजता
मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात काँग्रेस अडचणीत; थेट राहुल गांधींकडे महिला खासदारांची तक्रार
उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून जागावाटपात आडकाठी आणली गेली असं काँग्रेसच्या महिला खासदारांनी राहुल गांधींच्या भेटीदरम्यान म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारात एकवाक्यता नव्हती आणि पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक खासदारांची मते विचारात घेतली नाहीत, असेही या महिला खासदारांनी सांगितले. महिला खासदारांनी नाना पटोले विरोधात राहुल गांधीकडे तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे. पक्षांतर्गत कुरघोडीमुळे कांग्रेसचं नुकसान होत असल्याचंही या महिलांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून अडचणीत आणण्याचे प्रकार घडले, काँग्रेस पक्ष संघटनेतही मोठा गोंधळ पाहायला मिळाला, असं निरिक्षणही या खासदारांनी नोंदवलं आहे. जबाबदार नेत्यांनी स्वतःला भावी मुख्यमंत्री मानून आपल्या जवळच्या व्यक्तींना उमेदवारी वाटप केल्याने हे अपयश आल्याचे सांगण्यात आल्याचे कळते.
4 Dec 2024, 08:47 वाजता
राहुल गांधींची पराभवावर चर्चा; महाराष्ट्रातील महिला काँग्रेस खासदारांची घेतली भेट
मित्रपक्षामुळे कांग्रेसला निवडणूकीत फटका बसल्याची तक्रार कांग्रेस महिला खासदारांनी राहुल गांधीकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या सुमार कामगिरीबाबत महिला खासदारांनी राहुल गांधींकडे तक्रार नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधींनी पक्षाच्या लोकसभेतील महिला खासदारांसमवेत चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रातील वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, शोभा बच्छाव तसेच प्रतिभा धानोरकर आदींचा समावेश होता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमधील काँग्रेसच्या कामगिरीबाबतही राहुल यांनी मते जाणून घेतली. यावेळी प्रियांका गांधी तसेच संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे देखील उपस्थित होते.
4 Dec 2024, 08:42 वाजता
दक्षिण भारतातील भूकंपाचा केंद्रबिंदू सापडला
तेलंगानामधील मुलुगू येथे आज (बुधवार, 4 डिसेंबर 2024) सकाळी दक्षिण भारताला बसलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिक्टर स्केल वर हा भूकंप 5.3 तिव्रतेचा नोंदवण्यात आला. मुलुगूपासून 36 किमी एनएनडब्ल्यू तीव्रतेचा भूकंप झाला. खोली 35 किमी होती आणि ईएमएससीने याची नोंद करण्यात आली.