Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील व दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राजकीय घडामोडींच्या दृष्टीने आजचा दिवस महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. नेमकं आज काय घडणार? दिवसभरातील सर्वच घडामोडींचा घेतलेला धावता आढावा या ठिकाणी पाहता येईल...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील व दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार

4 Dec 2024, 20:55 वाजता

कपिल पाटील, राहुल नार्वेकर फडणवीसांच्या भेटीला

माजी खासदार कपिल पाटील तसेच आमदार राहुल नार्वेकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर वर दाखल

जिंतुरच्या नवनिर्वाचीत आमदार मेघना बोर्डीकर आणि नाशिक पश्चिमच्या सीमा हिरे ,देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी दाखल

4 Dec 2024, 19:26 वाजता

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं 

1. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोबतच काही मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या घ्यावा अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केली. 
2. शिवसेनेला मंत्रिमंडळात कुठली खाती अपेक्षित आहे आणि शिवसेनेचे कोण संभाव्य मंत्री असू शकतात याबाबत ही चर्चा झाली. 
3. या सगळ्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून कळवणार असल्याच देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना सांगितले.

सूत्र

4 Dec 2024, 18:56 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडवणीस यांच्यात बंद दाराआड बैठक सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडवणीस यांच्यात बंद दाराआड बैठक सुरू

उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील व दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार - सूत्र 

4 Dec 2024, 18:14 वाजता

देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल

एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत

4 Dec 2024, 18:03 वाजता

एकनाथ शिंदे यांना मनधरणी करण्याचा प्रयत्न

शिवसेना आमदारांची वर्षावरील बैठकीत एकनाथ शिंदे यांना मनधरणी करण्याचा प्रयत्न - सूत्र

एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व करावं आणि सोबत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं यासाठी सकारात्मक चर्चा 

त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांच्या भूमिकेवर  सकारात्मक...सूत्र

4 Dec 2024, 17:02 वाजता

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार-  सूत्र

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती

उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार 

सरकारमध्ये सामील होणार - सूत्र

4 Dec 2024, 16:41 वाजता

आज संध्याकाळी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक पार पडणार 

वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात होणार चर्चा 

उद्या आझाद मैदानावर किती मंत्री शपथ घेणार याबाबत होणार चर्चा 

उद्या मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री घेणार शपथ

4 Dec 2024, 16:38 वाजता

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये टोलेबाजी 

तुम्ही आणि अजित पवार उद्या शपथ घेणार का? असं विचारलं असता एकनाथ शिंदे उत्तर देत होते की, संध्याकाळपर्यंत थांबा. तेवढ्यात अजित पवार म्हणाले, "संध्याकाळपर्यंत त्यांचं समजणार आहे. मी तर घेणार आहे. मी थांबणार नाही". त्यावर टोला लगावत एकनाथ शिंदे म्हणाले, "अरे दादांना तर अनुभव आहे दुपारीही घेण्याचा आणि सकाळीही घेण्याचा". यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. पुढे अजित पवार म्हणाले की, "पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती. राहून गेलं होतं ते आता पुढचं 5 वर्षं ठेवणार आहे". 

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

4 Dec 2024, 16:24 वाजता

अजित पवार दिल्लीला का गेले होतं याचं कारण महायुतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तीन महत्त्वांच्या कामासाठी अजित पवार दिल्लीला गेले होते, असं त्यांनी स्वत: सांगितलं. 

बातमी सविस्तर वाचा - Ajit Pawar : दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा, 'अमित शाहांच्या भेटीसाठी...'

4 Dec 2024, 16:00 वाजता

मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना शिवसनेचा पाठिंबा आहे. महायुती जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.