Maharashtra Breaking News LIVE: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभेच्या मैदानात...

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील ताज्या घडामोडी आणि लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभेच्या मैदानात...

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभेची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ताज्या घडामोडी आणि लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया.

16 Oct 2024, 12:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कॉमनमॅन सुपरमॅन झाला पाहिजेः एकनाथ शिंदे
 
विरोधकांनी आमच्या विरोधात एक व्हिडिओ बनविला गेला. बनवणारा शुद्धित होता का? 2 कोटी 30 लाख महिलांच्या खात्यावर पैसे टाकले. लाडकी बहीण योजनेला कोणी टच केला कर त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे. 

16 Oct 2024, 11:57 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: आमची कामं रिपोर्ट कार्डमध्ये मावत नाहीः एकनाथ शिंदे
 
पायाभूत सुविधा वेगाने सुरू आहेत. एवढी कामं केली पण सगळंच रिपोर्टमध्ये मांडता आलं नाही. रिपोर्ट कार्ड सादर करायला हिंमत लागते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.  

16 Oct 2024, 11:52 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा संपवणारः देवेंद्र फडणवीस
 
मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा संपवणार. 145 सिंचन प्रकल्पाला सुधारित मान्यता दिली. नदीजोड प्रकल्प सुरू केला. सिंचन क्षेत्रात भरीव कामगिरी केली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

16 Oct 2024, 11:49 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: आमचं सरकार गतीशीलः देवेंद्र फडणवीस
 
आमच्या कामाची गती रिपोर्ट कार्डमधून दिसणार आहे. हे गती आणि प्रगतीचं सरकार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

16 Oct 2024, 11:45 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: वीज माफी योजना कायम करणारः अजित पवार

लाडकी बहिण योजना तात्पुरती नाही, विरोधकांकडून फेक नरेटिव्ह. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. वीज माफी योजना कायम करणार, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

16 Oct 2024, 11:44 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद; रिपोर्ट कार्ड केलं प्रकाशित

आमच्या समोरच्या लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला.आमचा 2022 ते 2024 चे रिपोर्ट कार्ड देत आहोत. यांनी तिजोरी मोकळी केली असे काहींनी आरोप केले. शेवटच्या अर्थसंकल्पमध्ये काही तरतुदी केल्यात त्यावर टिंगल टवाळी केली, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.  

16 Oct 2024, 11:06 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद; रिपोर्ट कार्ड केलं प्रकाशित

16 Oct 2024, 11:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  पुढील 48 तासात महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या CEC ची आज दिल्लीत बैठक.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात होणार बैठक.2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झालेल्या नावांमधून मतदार संघ निहाय उमेदवारांच्या नावावर आज शक्कामोर्तब होणार. भाजपने 2019 च्या विधानसभेला जिंकलेल्या 100 पेक्षा आधिक जागांवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बैठकीला महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, आशिष शेलार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार. आजच्या बैठकीनंतर पुढील 48 तासात महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

16 Oct 2024, 10:28 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध भाजपा संघर्ष

कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक मतदार संघात महायुतीमध्येच अंतर्गत कलह असल्याचं उघड झालं. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मूळ भाजपचे कार्यकर्ते आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आवाडे पिता पुत्रांना स्वीकारताना दिसत नाहीयेत. त्यामुळे भाजपमध्येच अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

16 Oct 2024, 10:18 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  राज्यात घडामोडींना वेग

राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर घडामोडींना वेग. जागा वाटपाबाबत अंतिम चर्चेसाठी महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा दिली दौरा