Maharashtra Breaking News LIVE: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभेच्या मैदानात...

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील ताज्या घडामोडी आणि लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभेच्या मैदानात...

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभेची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ताज्या घडामोडी आणि लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया.

16 Oct 2024, 10:08 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अंधेरीतील लोखंडवाला येथील इमारतीला आग; तीन जणांचा होरपळून मृत्यू

अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एका इमारतीला आग लागली आहे. दहाव्या मजल्यावर ही आग भडकली असून आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. 

16 Oct 2024, 10:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  तूरीच्या बाजारभावात घसरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली

वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीत तूर पिकाच्या बाजारभावात घसरण होत आहे.वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तूरीला प्रति क्विंटल ८५७० ते ९१५५ रुपयांदरम्यान भाव मिळत आहे.तुरीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने बाजारात आवकही घटल्याचे दिसून येते.

16 Oct 2024, 09:51 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  वर्ध्याच्या देवळी मतदारसंघावर शिंदे गटाच्या दाव्यानंतर भाजपचाही दावा

वर्ध्याच्या देवळी मतदार संघात महायुतीमध्ये जागा कुणाच्या वाट्याला जाणार यावर चर्चा सुरू असताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी युतीमध्ये देवळी येथून लढण्याची तयारी केली आहे. देवळी मतदार संघाची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाने देखील मागितली आहे. शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांच्याकडून देवळी वर दावा करण्यात आला होता. तर आता भाजपकडून राजेश बकाने यांनी जोरदार तयारी चालविली असून देवळी विधानसभेवर भाजपने दावा केला आहे

16 Oct 2024, 09:21 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली

रत्नागिरी- मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली. चिपळूण जवळील परशुराम घाटातील संरक्षक भिंत मध्यरात्री कोसळली मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाचा दर्जा पुन्हा एकदा समोर आला आहे.  सध्या या महामार्गावरची वाहतूक एकेरी लाईन मध्ये सुरू गेली दोन ते तीन वर्ष परशुराम घाट हा पूर्णपणे खोदून हा महामार्ग तयार करण्यात आला होता. मात्र अद्यापही या महामार्गावर दरड कोसळणे आणि डोंगर खचणे सुरूच आहे. 

16 Oct 2024, 09:01 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: भाजपवर नाराज असलेले संजय काकडे आज देवेंद्र फडणवीसांना भेटणार

काही दिवसापूर्वी संजय काकडे हाती तुतारी घेणार अशी होती चर्चा.मात्र आज फडणवीस यांची भेट घेत असल्याने काकडे काय भूमिका घेणार याकडे लक्ष. दरम्यान आचासंहितेनंतर निर्णय जाहीर करु अशी भूमिका काकडेंनी या आधी घेतली होती.

16 Oct 2024, 08:38 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: विधानसभेसाठी महायुती- मनसे एकत्र येणार?

महायुती आणि मनसे विधानसभेसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. महायुती आणि मनसेमध्ये युतीसंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील काही जागांवर महायुती मनसेविरोधात उमेदवार नाही, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभेत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळं आता मनसे-महायुती एकत्र येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

16 Oct 2024, 08:09 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

पुण्यात अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे दिले आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दीपक मानकर यांना संधी न दिल्याने पदाधिकारी आक्रमकदीपक मानकर हे अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आहेत. याआधीही पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना भेटून दीपक मानकर यांना आमदार करावं अशी केली होती मागणी

16 Oct 2024, 08:08 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्याची भाजपची तयारी अंतिम टप्प्यात

जाहीरनाम्याऐवजी भाजपने त्याचे स्वरूप 'अंमलबजावणी आराखडा' असे करण्याचे केले निश्चित. पारंपरिक जाहीरनाम्याच्या पुढे जाऊन त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाईल, अशी माहिती भाजपचे माजी खासदार डॉ. विनय सहस्राबुद्धे यांनी दिली.

16 Oct 2024, 08:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चाकणकर यांना पुन्हा पुढील तीन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला आणि बाल विकास विभागाकडून तसा आदेश जारी केला गेला आहे

16 Oct 2024, 08:06 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यात मनसेच्या बैठकांचा धडाका

कालच राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. तर मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत.