'दानवेंच्या विरोधात निवडणूक लढवा', शिवसैनिकांचा खोतकरांच्या घराबाहेर ठिय्या

 जालन्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दबावतंत्राचे हत्यार वापरण्यास सुरुवात केली आहे.

Updated: Mar 12, 2019, 02:31 PM IST
'दानवेंच्या विरोधात निवडणूक लढवा', शिवसैनिकांचा खोतकरांच्या घराबाहेर ठिय्या  title=

जालना : राज्यात एकत्र लोकसभा आणि विधानसभा लढण्याचा निर्णय युतीने घेतला असला तरी काही जागा या अद्यापगही वादग्रस्तच आहेत. निवडणूक तोंडावर आली असताना खोतकर-दानवे संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.  शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कोणत्याही परिस्थितीत जालना मतदार संघातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवावी अशी स्थानिक शिवसैनिकांची प्रबळ इच्छा आहे. या मागणीसाठी जालन्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दबावतंत्राचे हत्यार वापरण्यास सुरुवात केली आहे.

Image result for khotkar danve zee

जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खोतकरांच्या जालन्यातील बंगल्यासमोर ठिय्या देत घोषणाबाजी सुरू केली आहे. दानवे यांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढत देऊन खोतकरांनी निवडणूक लढवावी, अशी या शिवसैनिकांची मागणी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्याकडून युतीची घोषणा झाल्यानंतरही काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी दानवे यांना मदत करणार नसल्याची भूमिका जाहीरपणे उघड केली होती.

Image result for khotkar zee

खोतकर या मतदारसंघातून निवडणूक लढणार की नाही ? याबाबत अजूनही पक्ष श्रेष्ठींकडून निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसैनिक आता आणखीनच आक्रमक होताना दिसून येत आहे. शिवसैनिकांनी सुरु केलेलं उपोषण हे दानवे आणि खोतकर या दोन्हीही नेत्यांवर दबावतंत्र असल्याची चर्चा आहे. आज सकाळपासून अर्जुन खोतकर यांच्या घरी शिवसेनेचे कार्यकर्ते जमले, रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवा अशी शिवसैनिकांची मागणी आहे.

'मला दोन दिवस द्या'

Image result for arjun khotkar zee

खोतकर शिवसैनिकांची समजूत काढत आहेत. पण शिवसैनिक आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. मला दोन दिवस द्या. मी पक्षश्रेष्ठींशी बोलतो आणि निर्णय सांगतो असे खोतकरांनी शिवसैनिकांना सांगितले आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यातून कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.