Sangli Vishal Patil: सांगलीमध्ये महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज झाले. यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्यासाठी अर्ज भरला. यावेळी सांगलीत विशाल पाटील यांनी भाषण सुरू केले. भाषणादरम्यान त्यांनी महाविकास आघाडी तसेच संजय राऊत यांच्यावर टिका केली.
संजय राऊत सांगलीत आले. बोलून गेले. पण सांगलीत ही भाषा शोभणारी नाही. राजकारण करायचे तर संयमाने करा, असे आव्हान यावेळी विशाल पाटील यांनी दिले. आज पाहिली बैठक आहे. पुढे अजून फड रंगणार आहे. हे बंड काँग्रेसच आहे. काँग्रेसचे चिन्हे नेऊ पाहत आहे. आता माघार महाविकास आघाडीने घ्यावी,19 तारखेला आमच्या उमेदवारीला एबी फॉर्म जोडावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील बाळासाहेब आपल्या पाठीशी आहेत. जिल्ह्यातील बाळासाहेब आणि त्यांचे कार्यकर्तेदेखील ताकतीने पाठिंबा देत आहेत.हा लढा काँग्रेस पक्षाचा, कॉंग्रेसमधले हे बंड आहे. जेंव्हा जेंव्हा वसंतदादा पाटील घराणे अडचणीत असते, त्यावेळी अंजनी पुत्र पाठिशी असतात असे ते म्हणाले.
काल आर आर आबांचे समाधीचे दर्शन घेतले आहे. वैराग्य आमचे घर संपवयाला लागेल म्हणुन जयश्री ताई पाटील माझ्या रॅलीत सर्वात पुढे राहिल्या..काँग्रेस मध्ये बंड करणे आम्हाला देखील योग्य वाटत नाही..
ज्या ज्या वेळी मला काँग्रेसने थांब म्हटले मी थांबलो. मी स्वार्थसाठी लढत नाही असे त्यांनी सांगितले.
2005 साली वडील वारल्यानंतर मला उमेदवारी भेटली नाही, पण मी थांबलो. आजपर्यत थांबलोय. मी पक्षावर एकतर्फी प्रेम केले. वसंत दादा आणि काँगेसबद्दल बोलताना विशाल पाटील भावूक झालेले दिसले. लोकांनी आम्हाला सांभाळून घेतले. यावेळी पुन्हा राजकारण आडवे आले. ज्यावेळी राजारामबापू वारले ,त्यावेळी वाद संपला आहे, दादा बापू वाद संपला आहे. येताना मी राजरामबापू यांचे दर्शन घेऊन आलो आहे.
सांगलीत विशाल पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय. विशाल पाटलांच्या रॅलीत मोठा जनसमूह लोटल्याचं दिसतंय. मविआतला सांगलीचा वाद चिघळलाय.19 तारखेला 3 वाजेपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा विशाल पाटलांनी व्यक्त केलीय. विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्यास चंद्रहार पाटलांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
तर विशाल पाटलांची मनधरणी करु असा सूर मविआच्या नेत्यांनी लावलाय.. सांगलीची जागा काँग्रेसची नैसर्गिक जागा आहे.. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना असणं साहजिक आहे.. मात्र विशाल पाटील चुकीचं पाऊल उचलणार नाही याची काळजी घेऊ.. अशी भूमिका बाळासाहेब थोरातांनी घेतलीय.. तर वसंतदादा पाटलांनी कधीच काँग्रेसशी बेईमानी केली नाही..ती परंपरा सोडून विशाल पाटील वेगळी भूमिका घेणार नाहीत.. असं संजय राऊतांनी म्हटलंय..
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.