Loksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.

नेहा चौधरी | Updated: Mar 5, 2024, 08:37 AM IST
Loksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष title=
Loksabha Election 2024 Will Amit Shah solve the seat sharing rift in the Grand Alliance BJP Shiv Sena NCP Meeting Maharashtra Political news in marathi

Loksabha Election 2024 :  लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पक्षांमध्ये जागावाटपावरुन खलबत सुरु आहे. त्यात महायुतीमध्ये शिवसेनेने 22 आणि राष्ट्रवादीने 16 जागांची मागणी केल्याने भाजपची डोकेदुखी वाढलंय. आता हा तिढा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह सोडवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अमति शाह मंगळवार आणि बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून (Amit Shah Maharashtra tour) ते मुंबईत (Mumbai News) बैठक घेणार आहेत. (Loksabha Election 2024 Will Amit Shah solve the seat sharing rift in the Grand Alliance BJP Shiv Sena NCP Meeting Maharashtra Political news in marathi )

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज अमित शाहांसोबत बैठक होणार आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला या बैठकीत ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शाहांसोबत बैठक होणारेय. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होईल. सिधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड, संभाजीनगर, धाराशिव, परभणी, नाशिकच्या जागेवरुन महायुतीत वाद आहे. दरम्यान, येत्या आठ दहा दिवसांत महायुतीचं जागावाटप होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात बोलताना दिली. शिवसेना 22 जागा लढण्यावर ठाम असल्याने अमित शाह हा तिढा कसा सोडवणार हे पाहवं लागणार आहे. दरम्यान 2019 मध्ये 22 जागा लढलो आणि 18 जिंकलो, यावेळीही 22 जागाच हव्यात अशी मागणी शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाईंनी केली आहे. (bjp vs eknath shinde)

अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौ-यावर (Amit Shah Maharashtra Visit) आहेत. अमित शाहांच्या आज अकोला, जळगाव आणि संभाजीनगरमध्ये सभा आहेत. सोमवारी रात्री अमित शाहांचं संभाजीनगरमध्ये आगमन झालं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, मंत्री भागवत कराड, पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे उपस्थित होते. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास अमित शाह अकोल्याकडे रवाना होतील. त्यानंतर जळगावच्या सभेनंतर पुन्हा संभाजीनगरात दाखल होतील. सांस्कृतिक मैदानावर होणा-या भाजपच्या सभेला ते संबोधित करतील.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकींचं सत्र!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची देखील आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. दुपारी अडीच बाजता मुंबईत महिला आर्थिक विकास महामंडळ हॉलमध्ये ही बैठक होतेय. दोन दिवस होणाऱ्या बैठकीत मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात आलं आहे. मंगळवारी नाशिक, दिंडोरी, उत्तर पूर्व मुंबई, ईशान्य मुंबई, गोंदिया-भंडारा, हिंगोली, रायगड, धाराशिव या जागांचा आढावा घेतला जाणार आहे. तर बुधवारी कोल्हापूर, बुलडाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर, गडचिरोली मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल.

तर दुसरीकडे आज मुंबईत काँग्रेस पक्षाचीसुद्धा महत्त्वाची बैठक होणार आहे. टिळकभवन इथे होणाऱ्या बैठकीत लोकसभा जागावाटपासंदर्भात चर्चा होणार आहे. राज्यातील सर्व प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित असतील. 6 मार्चला दिल्लीत काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा जागांचा आढावा घेतला जाईल आणि उमेदवारांची नावं दिली जातील. त्यापूर्वी राज्यातील काँग्रेस कोअर कमिटीची बैठक होणार आहे.