Nagpur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : नागपुरातून नितीन गडकरी यांची हॅटट्रिक

Nagpur Lok Sabha Election Results 2024 : राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बालेकिल्ला नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी हॅटट्रिक केलीय. नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये ही थेट लढत झाली. 

नेहा चौधरी | Updated: Jun 4, 2024, 04:41 PM IST
Nagpur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : नागपुरातून नितीन गडकरी यांची हॅटट्रिक title=
loksabha nivdnuk nikal 2024

Nitin Gadkari wins Nagpur Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीचसंपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या नागपूरचा गड राखण्यात नितीन गडकरी यांना यश आलं आहे. दीड लाख मतांनी त्यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा पराभव केला आहे. नितीन गडकरी यांच्या या विजयामुळे त्यांनी हॅटट्रिक केलीय. भाजपचं बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात काँग्रेसला अपयश आलंय. नागपुरात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिला त्यामुळे तिथे दुहेरी लढत झाली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला नागपुरात 47 टक्के मतदान झालं. विदर्भातील नागपूर मतदारसंघ सर्वात प्रतिष्ठेची मानली गेली. 

कधी काळी नागपूर हा काँग्रेसचा गड समजला जायचा. 1952 मधील पहिली लोकसभा निवडणूकपासून या नागपुरात दीर्घकाळ काँग्रेसचं वर्चस्व पाहिला मिळालं. अनुसयाबाई काळे या काँग्रेसकडून दोन वेळा खासदार झाल्या. त्यानंतर 72 वर्षांत काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार हेच एक होते ज्यांनी सलग तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकले. आता या यादीत नितीन गडकरी यांचं नाव शामिल झालंय. 

हेसुद्धा वाचा - Maharashtra Lok Sabha Winner List: महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; वाचा एकाच क्लिकवर

नितीन गडकरी यांनी यंदा लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देशभरात चांगल्या आणि वेगळ्या विकासकामांच्या जोरावर मतदारांना आपला खासदार निवडा अशी विनंती केली होती. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना तब्बल 2,16,009 मतांनी पराभव केला होता. 

यंदा नितीन गडकरींची विजयाची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेसने शहराध्यक्ष विकास ठाकरेंना रिंगणात उतरवलं होतं, पण त्यांना अपयश झाले. गेल्या 10 वर्षांमध्ये ठाकरे यांनी राजकीय अनुभव आणि पक्ष संघटनेच्या जोरावर काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. ठाकरे यांनी महापालिकेची निवडणूक पाच वेळा लढली त्यातील तीन वेळा ते विजयी झाले. तर विधानसभेची निवडणूक ते तीन वेळा लढले आणि त्यातील एकाच मध्ये त्यांचा विजय झाला. राजकीय कारकीर्दीत ते नवव्यांदा नितीन गडकरीविरोधात रिंगणात उतरले खरं पण त्यांना विजय होता आलं नाही.