शेतकऱ्यांसाठी खुशखबर; २० एप्रिलनंतर कापूस खरेदीला सुरुवात

कापूस खरेदीसाठी ऑनलाईन बुकिंग आणि फोन बुकिंगचा वापर करण्यात येईल. 

Updated: Apr 17, 2020, 08:14 PM IST
शेतकऱ्यांसाठी खुशखबर; २० एप्रिलनंतर कापूस खरेदीला सुरुवात title=

मुंबई: लॉकडाऊनमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, आता २० एप्रिलनंतर राज्यभरात सरकारकडून कापूस खरेदीला सुरु करण्यात येणार आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कापूस खरेदी सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

ऊसतोड कामगारांसाठी खुशखबर, धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश

यासाठी ऑनलाईन बुकिंग आणि फोन बुकिंगचा वापर करण्यात येईल. बुकिंग झाल्यानंतर शेतकऱ्यांना केंद्रावर येण्याचा दिवस आणि वेळ कळवला जाईल, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. राज्य सरकारने यापूर्वीच कृषी क्षेत्रासंदर्भातील कोणत्याही कामांना आणि वाहतुकीला आडकाठी करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच ग्रामीण भागातील लॉकडाऊन शिथील करण्याच्या हालचाली सुरु आहेत. रेड झोनमधील १२ महापालिका वगळून इतर जिल्हे आणि ग्रामीण भागातील परिस्थितीनुसार उद्योग-व्यापर २० एप्रिलपासून  सुरु करण्यात येणार आहेत. 

Lockdown-2 : एक वर्षाच्या बाळाला घेऊन जोडप्याचा सायकलवरून प्रवास

जे उद्योग आपल्या परिसरात कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करून उद्योग सुरु करायला तयार असतील तर त्यांना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.  मात्र सर्व काळजी घेऊन नियम पाळून उद्योग सुरू करावे लागणार आहे. वाहतुकीची व्यवस्था काही कारखाने स्वतः सुरू करू शकत असतील तर त्यांना परवानगी देण्याबाबत विचार सुरु आहे.