Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नाशिकच्या (Nashik) पत्रकार परिषदेत अजित पवारांनी पुन्हा एकदा ऑन कॅमेरा डोळा मारला.. पक्ष, चिन्ह आणि नावाबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता.. तेव्हा उत्तर दिल्यानंतर अजित पवारांनी डोळा मारला. याआधी मार्चमध्येही मविआ सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलत होते, तेव्हाही अजित पवारांनी डोळा मारला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. एका पत्रकाराला प्रश्नाचे उत्तर नंतर देतो, हे सांगण्यासाठी डोळा मारला होता, असं अजितदादांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. आताही अजित पवारांनी कोणाला डोळा मारलाय याची चर्चा सुरु झालीय..
अजित पवार नाशिकमध्ये
नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय...या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknat Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis), अजित पवार नाशिकमध्ये दाखल झालेयत...यासोबत आठ मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित आहेत...या उपक्रमासाठी 30000 लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आलीय...नाशिक शहरातील महापालिकेच्या सिटी लिंक बसेस या कामासाठी जुंपण्यात आल्यायत. यावेळी बोलताना अजित पवार यांनी नाशिक चा विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही याचा विश्वास देतो असं सांगितलं. नाशिक पुणे रेल्वे हा प्रकल्प लवकरच लागेल, ओझर विमानतळ विकास, सिंहस्थसाठी पायाभूत सुविधा विकास, समृद्धी महामार्ग नाशिक ते मुंबई हे काम लवकर पूर्ण केले जाईल असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला.
अजित पवारांचं जंगी स्वागत
त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. अजित पवार वंदे भारतने नाशिकला दाखल झाले. यावेळी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवारांचं स्वागत करून पाठिंबा जाहीर केलाय. अजित पवार यांन दौऱ्या दरम्यान नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर नाशिक रोड ते विश्रामगृहपर्यंत अजित पवारांसाठी बाईक रॅलीत सहभागी झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जागोजागी स्वागत केलं...
कमी पावसाबद्दल चिंता
राज्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यानं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी चिंता व्यक्त केलीय. राज्यावर दुबार पेरणीचं संकट असल्याची भीतीही त्यांनी बोलून दाखवलीय.. दरम्यान राज्याच्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. यावेळी मोदींसारखा दुसरा नेता भारतात नसल्याचं सांगत अजित पवारांनी मोदींचंही कौतूक केलंय..
संजय राऊत यांची टीका
शिंदे गटाला अजित पवारांची धुणी भांडी करावी लागतील असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय.. राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप कालच पार पडलं.. अजित पवारांकडे अर्थखातं सोपवण्यात आलं.. विशेष म्हणजे अजित पवारांविरोधातच तक्रार करत शिंदे गट सत्तेतून बाहेर पडला होता. त्यावरुनच संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय.. तर विरोधक बावचळले असून तीन पक्षात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं उत्तर चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांना दिलंय