राज्यातील शाळांचे खासगीकरण होणार का? प्रश्नावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर काय म्हणाले? जाणून घ्या

Schools Privatized: शाळांची स्थिती बिकट आहे, असे दिपक केसरकर म्हणाले शाळा दुरुस्तीसाठी कंपन्या पुढे आल्या तर काय झालं? असा प्रश्न केसरकरांनी उपस्थित केला.

Pravin Dabholkar | Updated: Oct 16, 2023, 12:54 PM IST
राज्यातील शाळांचे खासगीकरण होणार का? प्रश्नावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर काय म्हणाले? जाणून घ्या title=

Schools Privatized:  राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ‘दत्तक शाळा’ यनावाखाली सरकारी शाळांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचा आरोप राज्य सरकारवर करण्यात येणार आहे. यावर आता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. काय म्हणाले शालेय शिक्षणमंत्री सविस्तर जाणून घेऊया. 

राजकारणापासून सगळं सुटलं होत फक्त शिक्षण विभाग राहिला होता पण दुर्दैवी असल्याचे केसरकर म्हणाले. शाळांचे खासगीकरण होणार नाही. शिक्षक लाखो पगार घेत आहेत, दुसरीकडे शाळांची स्थिती बिकट आहे, असे दिपक केसरकर म्हणाले शाळा दुरुस्तीसाठी कंपन्या पुढे आल्या तर काय झालं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते पैसे एनजीओकडे जातात. एनजीओ मुलांसाठी एवढं काही काम करतात असं नाही. सगळं एकाचवेळी मुलांसाठी झालं पाहिजे, असे ते म्हणाले.

शाळांच्या नावाला ट्रस्टचं नाव आलंय. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ट्रस्टच्या हातात शाळा देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सुप्रियाताई राजकारणासाठी बोलत असतील. पण कोणाबद्दल काय बोलायच याला मर्यादा नाही. पवार साहेबांना मी काय आहे हे माहिती आहे. माझ्या पॉलिसी चुकल्या नाहीत. शिक्षक संघटनांना मिटिंग घेऊन माहिती देणार आहे. तुम्हाला शिकवायच आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवले आहेत. शिक्षणबाबत आरोप करणारे पुढारी आणि संघटना यांची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

एकही शाळा बंद करण्याची ऑर्डर नाही. समूह शाळेत जायच असेल तर शहरात सोय होते. ग्रामीणला का सोय होत नाही? त्यामुळे शाळा बंद अजिबात केल्या जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.

पवित्र पोर्टल ओपन होत आहे. शिक्षक भरती बदल्यांमध्ये सगळ्या चॉईस दिल्या आहेत. 30 हजार शिक्षक भरती पूर्ण होणार असून ती थांबवायची तयारी नाही. स्टे आल्यामुळे थोडं लेट झाल्याचेही ते म्हणाले.