Maharashtra Weather Update: पावसाचे दिवस आणि त्यात रविवारची सुट्टी असं समिकरण जुळून आल्याने बहुतांशजण सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडतील. अनेकजण घरी राहूनची सुट्टी घालवणे पसंत करतील. अशावेळी तुम्ही ज्या जिल्ह्यात राहताय किंवा ज्या ठिकाणी जाणार आहात, तिथे किती पाऊस कोसळणारेय, हे आधीच माहिती करुन घ्या. अन्यथा ऐनवेळी तुमचे प्लानिंग गडबडू शकते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने विविध अलर्ट जारी केले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मध्य महाराष्ट्राला हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केलाय. मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पालघर, पुणे, साता-यात रेड अलर्ट आहे. तर मुंबईतही आज पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिधुदुर्ग, रायगड, नाशिक, या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवलाय. तर नागपूरमध्ये येलो अलर्ट आहे. हवामान खात्याकडून मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. अलिबाग, पेण , कर्जत, खालापूर, खोपोली भागात अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतायत. दक्षिण रायगड जिल्ह्यात मात्र पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळतंय.
पुणे जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पुण्यात उपनगरासह घाटमाथ्यावरपावसाचा जोर कायम आहे. विशेष करून धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे.त्यामुळे खडकवासला धरणातून २७०१६ कयूसेक विसर्ग सोडण्यात आलाय तर भाटघर धरणातून १९०१२कयूसेक ने विसर्ग सुरू आहे. पुण्यात घाटमाता आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने डेक्कन परिसरातील नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीये.सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीमध्ये दोन सोसायटीमध्ये पुराचे पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय. सुरक्षेच्या कारणास्तव पुलाची वाडी, प्रेमनगर तसंच एकतानगरीमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय.
मुळशी तालुक्यातील चाळीस गावांना सिंचन तसेच पिण्याचे पाणी व औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणारे मुळशी धरण शंभर टक्के भरले. मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून धरणात पाणी पातळी नियंत्रणात आणण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदी पात्रामध्ये 24 हजार 745 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तरी मुळशी मधील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मुळशी टाटा धरण प्रशासनाने दिला आहे.
पुण्याहून मुंबई कडे तसेच मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर पनवेलच्या भिंगार वाडी ते पळस्पे फाटा दरम्यान वाहतूक कोंडी विकेंड, पावसाळी पर्यटन यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढलेली दिसतेय. नवी मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाची संततधार आहे. सध्या अधूनमधून जोरदार सरी बरसताना दिसतायत.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(18.4 ov) 125
|
VS |
AUS
126/6(13.2 ov)
|
| Australia beat India by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.