मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात ३ ठार, ४ जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार तर ४ गंभीर जखमी झालेत. औंढे गावाजवळ हा अपघात झाला. 

Updated: Jun 3, 2017, 05:06 PM IST
मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात ३ ठार, ४ जखमी

औंढे : मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार तर ४ गंभीर जखमी झालेत. औंढे गावाजवळ हा अपघात झाला. 

मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही झायलो गाडी जात होती. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेड्सला आदळली. 

हा अपघात इतका भीषण होता की यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये १२ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. तर ४ जण गंभीर जखमी झालेत. जखमींना लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.