Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले असून आरक्षणाच्या मागणीवरुव त्यांनी आता थेट सरकारला इशारा दिला आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आंतरवाली सराटीमधून निघालेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत लाखोंचा जनसमुदाय देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे जरांगे हे आंदोलनावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.
सात महिने आम्ही वेळ दिला होता. मात्र यापेक्षा आणखी सरकारचे मराठा समाजाने काय ऐकायचे? मुंबईला गेल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे गावागावातून मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या मराठा पोरांच्या पाठीमागे उभे राहा असे आवाहन मनोज जरांगे यांनी समाज बांधवांना केले आहे. तुमच्या लेकराला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून मुंबईच्या दिशेने झुंज द्यायला चाललोय असेही जरांगे यांनी सांगितले. एकाही मराठ्यांनी घरी न राहता आपली ताकत 26 जानेवारीला दाखवून दिली पाहिजे असे जरांगे म्हणाले आहे.