सोलापूरचे सुपुत्र शहीद जवान सुनील काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सुनील काळे यांना वीरमरण आले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

Updated: Jun 24, 2020, 12:24 PM IST
सोलापूरचे सुपुत्र शहीद जवान सुनील काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार title=

सोलापूर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना  CRPF जवान सुनील काळे शहीद झालेत. या वीर जवानांवर पानगांव येथे आज सकाळी शोकाकुळ वातावरणात  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. वीरमरण आलेल्या जवान सुनील काळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्यने ग्रामस्थांचा जनसमुदाय जमला होता. यावेळी अनेकांच्या अश्रुना बांध फुटला होता. अखेरचा निरोप देताना वातावरण सुन्न झाले होते. एकदम शोकाकुळ वातावरण झाले होते.

दहशतवाद्यांच्या चकमकीत सुनील काळे यांना वीरमरण आले. जवान सुनील काळे यांनी  दोनअतिरेक्यांना ठार करण्यात महत्वाची भूमिका बजावली. काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु असताना दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफ जवान सुनील काळे हे शहीद झालेत. 

मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील बंडजू भागात सुरक्षा दलाने दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला घेराव घातला. यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी जवान सुनील काळे यांनी चोख पत्त्युतर दिले. त्यावेळी ते गंभीर जखमी झाले होते. त्यांनी दोन दहशवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले. त्यानंतर ते शहीद झालेत. दरम्यान, दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसह संयुक्त कारवाई केली.