१३ वर्षाच्या मुलाने दुचाकी चालवली, पण तो परतलाच नाही

ल्पवयीन मुलाला गाडी चालवायला दिल्याने, ही घटना घडल्याचं सध्या म्हटलं जात आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 3, 2017, 10:51 PM IST
१३ वर्षाच्या मुलाने दुचाकी चालवली, पण तो परतलाच नाही title=

ठाणे : ठाण्यात भरधाव बसच्या धडकेत १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर १५ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला दिल्याने, ही घटना घडल्याचं सध्या म्हटलं जात आहे.

१३ वर्षांच्या गुलाम कासमानीचा  जागीच मृत्यू

नितीन कंपनीजवळील चौकात एका खाजगी बसच्या चालकानं मोपेडवरून जाणाऱ्या दोन लहान मुलांना धडक दिली. १३ वर्षांच्या गुलाम कासमानीचा  जागीच मृत्यू झाला, तर १५ वर्षाचा हसन कासमानी मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी घडली.

१५ वर्षाचा हसन कासमानी गंभीर जखमी

मुलांच्या हाती गाडीची चावी देणारे पालकही या घटनेला तितकेच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. कारण अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणं हा कायद्याने गुन्हा आहे. 

अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणं हा कायद्याने गुन्हा

या अपघातात नेमकी कोणाची चूक आहे, याचा अधिक तपास सुरु आहे. मात्र अपघातातील दोन्ही मुलांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे.  या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे. 

पोलिसांचा फोन आल्यावर पालकांना धक्का

रोजप्रमाणे बाजारात जायचं म्हणून ते दुचाकी घेऊन गेले, मात्र पोलिसांचा फोन आल्यावर घरच्यांना अपघातांची कल्पना आली. या आधीही ते दुचाकी घेऊन बाहेर जायचे. मात्र ते इतके लांब जातील, याची कल्पना नसल्याचं पालकांनी म्हटलं आहे.