मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा सगळ्यांना वेढीस धरलं आहे. कोरोनाबाधितांच या काळात मनोबल वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कोरोनाबाधितांचे मनोबळ वाढवण्यासाठी थेट सैराटवरील 'झिंगाट' गाण्यावर डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (MLA Rohit Pawar Dance with Corona Patients, Video Goes Viral)
रोहित पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला रोहित पवार यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी रूग्णांशी संवाद साधत त्यांनी रूग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे सरकार लॉकडाऊन कधी हटवणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु पूर्वीची परिस्थिती लक्षात ठेवून एक गोष्ट नक्की की, ठाकरे सरकार यावेळी लॉकडाऊन खोलायला घाई करणार नाही. यामुळे राज्यातील लॉकडाऊनवरील निर्बंध एका झटक्यात काढून टाकण्याऐवजी ते चार टप्प्यात काढले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
1 जूनपासून ठाकरे सरकार लॉकडाऊन हटवण्यास सुरवात करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. यामुळे पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात राज्य सरकार प्रथम दुकाने सुरू करणार आहेत.
रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन १ जूननंतर शिथिल होण्याची शक्यता
- राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होतेय
- त्यामुळे राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात
- आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे मंत्री विजय वड्डेटीवार यांची माहिती