close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंब्र्याच्या तरुणांचा वर्दीवर हात, पोलिसांचे कपडेही फाडले

मुंब्र्यात तरुणांनी पोलिसांवर हात उचलला असल्याची घटना समोर आली आहे.

Updated: Aug 20, 2019, 11:24 PM IST
मुंब्र्याच्या तरुणांचा वर्दीवर हात, पोलिसांचे कपडेही फाडले

मुंब्रा : मुंब्र्यात तरुणांनी पोलिसांवर हात उचलला असल्याची घटना समोर आली आहे. तरुणांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना भररस्त्यात मारहाण केली. पोलीस कर्मचाऱ्यांवर हे तरुण अक्षरश: तुटून पडले होते. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे कपडेही फाडले. काही जणांनी तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यांत व्हायरल होत आहे. वाहतूक विभागाच्या वतीने मुंब्र्यांत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू होती. यावेळी काही दुचाकीस्वारांना पोलिसांनी पकडलं. पोलिसांनी वाहतूक परवाना ताब्यात घेतल्याने तरुणांनी जाब विचारत वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत या तरुणांची मजल गेली. गर्दीचा फायदा घेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईलही चोरण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी तीन तरुणांना अटक केली असून आणखी एक जण फरार आहे.