नागपुरात तरुणीकडून पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की

कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कशा मुजोरीचा सामना करावा लागतो याचा अनुभव पुन्हा एकदा नागपूरमध्ये आला. 

Updated: Sep 15, 2017, 10:43 PM IST
नागपुरात तरुणीकडून पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की title=

नागपूर : कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कशा मुजोरीचा सामना करावा लागतो याचा अनुभव पुन्हा एकदा नागपूरमध्ये आला. 

नागपूरच्या गजबजलेल्या कडबी चौक भागात हेल्मेट न घातलेल्या एका युवक युवतीला वाहतूक पोलिसांनी अडवले. मात्र यामुळे संतापलेल्या या तरूण तरूणीने पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. 

याआधीही अशाच प्रकारे नागपुरात संविधान चौकात एका तरूणाने पोलिसांना मारहाण केली होती. वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या युवक युवतीच्या विरोधात नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती बळावली आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.