Amol Mitkari on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यातील पूरस्थितीवरुन अजित पवारांना (Ajit pawar) चिमटा काढला आहे. उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं असा टोला त्यांनी लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा टोला लगावला. दरम्यान त्यावरुन आता राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे अशी जहरी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
"पाऊस पडणं आपल्या हातात नाही. पण असा पाऊस पडल्यानतंर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही याचं कोणतं प्लॅनिग केलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक तर पुण्याचे आहेत. ते नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं. त्यांनी यात लक्ष घालायला नको का? नदी जाणारं जगातील हे एकमेव शहर नाही. तिथे ज्या गोष्टी होतात त्या आपल्याकडे का होत नाही. इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा यावर बोललं पाहिजे," असी संतप्त टीका राज ठाकरेंनी केली आहे.
"दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण या सुपारीबहाद्दरांचं टोलनाक्याचं, भोंग्याचं किंवा इतर कोणतंही आंदोलन यशस्वी झालं नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे," अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
'उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण...,' राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, 'दिवे लावण्याचे उद्योग...'
सुपारीबहाद्दर नेत्यांकडून जनतेने योग्य तो धडा घेतला आहे. नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून पुण्यात भेट द्यायची. ज्या व्यक्तीला NDRF चा लाँग फॉर्म माहित नाही, तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतो हा अलीकडच्या काळातील राजकारणातील सर्वात मोठा जोक आहे अशी खिल्लीही त्यांनी उडवली आहे.
"मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पुण्याला वेळ लागणार नाही. हे सगळं त्याचंच चित्र आहे. सरकारकडून विकासाची योजना येते, पण टाऊन प्लानिंग नावाची काय गोष्टच दिसत नाही आहे. किती गाड्या य़ेतात, त्या पार्क कशा होणार? लोक जाणार कसे? टाऊन प्लानिंग करताना किमान हजार लोकांसाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या केल्या जात नाहीत. शाळा, हॉस्पिटल, बागा असाव्या लागतात. अशी कोणतीही गोष्ट आपल्या शहरांमध्ये राबवल्या जात नाही. दिसली जमीन की विक इतका एकच उद्योग सुरु आहे," असं राज ठाकरे म्हणाले आहेत