साताऱ्यातील पराभवानंतर जितेंद्र आव्हाडांनी उडवली उदयनराजेंची खिल्ली

भोसले यांच्यावर गुरुवारी पराभवाची नामुष्की ओढावली होती.

Updated: Oct 25, 2019, 07:30 PM IST
साताऱ्यातील पराभवानंतर जितेंद्र आव्हाडांनी उडवली उदयनराजेंची खिल्ली title=
साताऱ्यातील पराभवानंतर जितेंद्र आव्हाडांनी उडवली उदयनराजेंची खिल्ली

मुंबई: सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्यावर गुरुवारी पराभवाची नामुष्की ओढावली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून उदयनराजेंची खिल्ली उडविली. 'यंदाच्या लांबलेल्या पावसाळ्याने महाराष्ट्रात २७ बळी घेतले. साताऱ्यात एक राजकीय बळी घेतला. त्याचं नाव #उदयनराजे_भोसले', असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर ते भाजपच्या तिकिटावर साताऱ्यातून उभे राहिले होते.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पोटनिवडणुकीत उदयनराजे यांच्याविरोधात संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयनराजे भोसले यांच्यासाठी साताऱ्यात सभाही घेतली होती. मात्र, साताऱ्यात शरद पवारांनी भर पावसात घेतलेल्या सभेने ऐन मतदानाच्या आधी वातावरण फिरले होते.

साताऱ्यात भर पावसात शरद पवारांची सभा

त्यामुळे श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला होता.