मुंबई : शेतकरी संपाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. कालपर्यंत शेतात दिसणारा भाजीपाला आजपासून मोठया प्रमाणात बाजार समितीमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. लिलावप्रक्रियेत ही शेतकरी भाग घेणार आहेत. त्याचबरोबर संपाचा दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी सुकाणू समितीचे सदस्य रणनिती आखणार आहेत.
सुकाणू समितीच्या बैठकीत राजू शेट्टी यांनी कुठल्याही मंत्र्यांचे कार्यक्रम होऊ देऊ नका असे आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे. राज्यभर त्याचे पडसाद उमटतात का याकडे सर्वांचं लक्ष असेल. १२ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासह सरकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन, १३ तारखेला रेलरोको, रास्ता रोको असे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. तर १६ जूनला आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी दिल्लीत शेतकरी नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.