नागपूर: विदर्भातल्या शेतकऱ्यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खूषखबर दिलीय. नागपुरातील कृषी विद्यापीठाच्या जागेवर कृषी परिषद केंद्र सुरु होणार आहे. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह शेतीविषयक तंत्रज्ञानाचे धडे या माध्यमातून घेता येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली़य.
येत्या २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान रेशीमबाग मैदानावर दहाव्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलंय. यावेळी २३ ते २६ नोव्हेंबरला होणाऱ्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदींनी निमंत्रण दिल्याचंही गडकरींनी सांगितलंय.
दरम्यान, कृषी परिषद केंद्राचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होईल अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.