जालना : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यभरात बंद ची हाक देण्यात आली होती. जालन्यातील मामा चौकात वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सीएए,एनआरसी विरोधात जोरदार घोषणा बाजी करत मुख्य बाजार पेठ बंद करण्याच्या प्रयत्न केला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा बंद मागे घेतल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली. बंद शांततेतच पार पाडायचा होता असे यावेळी आंबेडकर म्हणाले.
पोलिसांनी जमाव बंदी असल्याचे सांगत कार्यकर्त्याना दुकानं बंद करण्यापासून रोखलं. या वेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांत जोरदार बाचाबाची झाली.यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला.दरम्यान गोंधळ घालणाऱ्या तीन ते चार कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले .जिल्ह्यात या बंद ला सकाळ पासूनच संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या आज बंदच्या दरम्यान सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या भाजप आमदारांना पाहून दुकाने बंद पडण्यास वंचित कार्यकर्त्यांनी दुकानदारांना भाग पाडल.. रेल्वे स्टेशन चौकात आज सकाळी भाजपचे आमदार रणधीर सावरकर मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांना पाहून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चौकातील दुकान बंद पाडण्यास सुरुवात केली.