Pune Crime : तू मॉडर्न नाहीस, नोकर बायका पण तुझ्यापेक्षा चांगल्या, असं म्हणणाऱ्या नवऱ्याला पत्नीने शिकवला असा धडा

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. टोमणे मारुन छळ करणाऱ्याला नवऱ्याविरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दिली. (Pune News ) त्यानंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.  

Updated: Jan 27, 2023, 12:43 PM IST
Pune Crime : तू मॉडर्न नाहीस, नोकर बायका पण तुझ्यापेक्षा चांगल्या, असं म्हणणाऱ्या नवऱ्याला पत्नीने शिकवला असा धडा
Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. टोमणे मारुन छळ करणाऱ्याला नवऱ्याविरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दिली. (Pune News ) त्यानंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तुला मॉडर्न मुलीसारखे राहता येत नाही, असे म्हणत पत्नीचा छळ करण्यात येत होता.  तू लो स्टॅंडर्ड आहेस, जर्मनीमध्ये नोकर बायका पण तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत. (Maharashtra Crime News in Marathi) तुला मॉडर्न मुलींसारखे राहता येत नाही. म्हणत पत्नीचा छळ करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पवन योगराज ग्रोवर (43, सेरेनो, पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. सध्या तो कामानिमित्त जर्मनीत वास्तव्यास आहे. 2006 पासून हा सर्व प्रकार सुरु होता. याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या उच्चशिक्षित असून त्यांचे उच्चशिक्षित असणाऱ्या पवन ग्रोवर याच्यासोबत 2006 मध्ये लग्न झाले आहे. 

पवन ग्रोवर हे सध्या कामानिमित्त जर्मनीत स्थायिक आहेत. दरम्यान लग्न झाल्यापासून आरोपीने वारंवार फिर्यादी यांना तू सुंदर दिसत नाही, तू मला आवडत नाहीस, तू वेडसर आहेस, तुला मॉडर्न मुलीसारखे राहणे जमतच नाही. तू लो स्टॅंडर्ड आहेस, जर्मनीमध्ये नोकर बायका पण तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत, असे टोमणे पती मारत होता. त्याचवेळी त्यांने पत्नीला माहेरी निघून जाण्यास सांगितले. पूर्णपणे बरबाद करुन टाकेन, अशी धमकी देऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करत छळ केल्याने गुन्हा दाखल आहे.

ब्लॅकमेल करत मित्राच्या पत्नीवर बलात्कार 

 मित्राच्या पत्नीला अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत बलात्कार करण्यात आला. इतकेच नाही तर मित्राच्या पत्नीला रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी जबरदस्ती केली. पुण्यातील चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. 

याप्रकरणी दोघा बहीण भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजिद मोहम्मद अली कुंजू (39) आणि त्याची बहीण या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील साजिद याला अटक करण्यात आली आहे. 39 वर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 2021 पासून वेळोवेळी हा प्रकार घडत होता. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी साजिद हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे.