Crime News : हातात हत्यार घेत जगदंब जगदंबचा जप... दोघांची हत्या करुन रस्त्याने फिरणाऱ्या आरोपीला अटक

Pune Crime : भररस्त्यात फिरणाऱ्या या व्यक्तीला पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. रक्ताने माखलेले कपडे, हातात हत्यार अशा अवस्थेत आरोपी फिरत होता. मात्र काही लोकांनी पुढे येऊन त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले

Updated: Feb 12, 2023, 03:48 PM IST
Crime News : हातात हत्यार घेत जगदंब जगदंबचा जप... दोघांची हत्या करुन रस्त्याने फिरणाऱ्या आरोपीला अटक title=

Crime News : पुण्यात (Pune News) जमीन खोदण्याच्या टिकावाने पती पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुहेरी हत्याकांडाने पुण्यातील (Pune Crime) दापोडी परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांची हत्या करुन आरोपी रक्ताने माखलेले कपडे घालून हत्यार घेऊन रस्ताने बिंधास्त फिरत होता. अशा अवस्थेत फिरणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या (Pune Police) ताब्यात दिले. भोसरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. मात्र या हत्याकांडाने लोकांमध्ये घबराट उडाली आहे.

बेसावध असताना केला टीकावाने हल्ला

शंकर नारायण काटे (60) आणि संगीता काटे (55) अशी हत्या झालेल्या पती- पत्नीची नावे आहेत. तर प्रमोद मगरुडकर (47) असे आरोपीचे नाव असून त्याला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दापोडीत बेसावध असलेल्या काटे दाम्पत्यावर प्रमोद मगरुडकर याने टीकावाने घाव घालून हत्या केली. काटे दाम्पत्य घरात बसले असतानाच प्रमोदने त्यांच्यावर टिकावाचे घाव घातले. मात्र काटे दाम्पत्याच्या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

यानंतर रात्री आरोपी प्रमोद तशाच अवस्थेत हत्यार घेऊन रस्ताने निघाला होता. यावेळी तो  'जगदंब जगदंब', असे शब्द पुटपटत होता. आरोपी प्रमोदला असे फिरताना पाहून नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली. काही जणांनी पुढे येऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी यानंतर प्रमोदकडे चौकशी सुरु केली आहे. मात्र अद्याप हत्येचे कारण समोर आलेले नाही.

नुकताच परतला होता दिल्लीवरुन

दरम्यान, आरोपी प्रमोद काही दिवसांपूर्वीच दिल्लीवरून आला होता. 2017 साली माझ्या आईचा मृत्यू झालेल्या व्यक्तीने बलात्कार केला आणि त्याच्या पत्नीने त्यास मदत केली असेही तो बडबडत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली. मात्र हा पूर्वनियोजित कट असण्याची शक्यताही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.