अश्लील फोटो पोस्ट करुन तरुणीची बदनामी, त्यानंतर जे घडलं ते धक्कादाय

या प्रकरणी या डॉक्टर तरुणीने पुणे पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

Updated: Nov 4, 2021, 07:58 PM IST
अश्लील फोटो पोस्ट करुन तरुणीची बदनामी, त्यानंतर जे घडलं ते धक्कादाय title=

पुणे : सध्या लोकं लग्न जमण्यासाठी मेट्रोमनी साईटवर रजिस्टर करतात आणि बायोडेट्यावरुन आपल्या लाईफ पार्टनरची निवड करतात. तुम्ही  मेट्रोमनी साईटवरुन फसवणूक झाल्याच्या देखील घटना ऐकल्या असतील. लोकांचा या साईटकडे वाढता कल पाहाता काही भामटे लोकं आपल्या फायद्यासाठी दुसऱ्यांचा वापर करतात, त्यांच्या भावनांशी खेळतात. सध्या पुण्यातून एक असचं प्रकरण समोर आहे. येथे मेट्रोमनी साईटवरुन भेट झाल्यानंतर एका कपलने तीन वर्ष डेट केलं. तरी देखील या मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडची फसवणूक केली आहे.

या मुलानं डेट केलं एका मुलीला आणि साखरपूडा केलं दुसऱ्याच मुलीसोबत. या व्यक्तीने दुसऱ्याच व्यक्तीसोबत साखरपुडा केलं असं या डॉक्टर तरुणीला समजताच तिने त्याला या सगळ्याबद्दल विचारणी केली असता, त्याचे तिला उलट परिणाम भोगावे लागले. या नराधमानं सोशल मीडियावरती या डॉक्टर तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करुन तिची बदनामी केली.

या प्रकरणी या डॉक्टर तरुणीने पुणे पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली, ज्यानंतर पोलिसांनी सुधांशु पारीख नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीत, फिर्यादीयांनी भारत मेट्रोमनी साईटवर लग्नाची जाहिरात दिली. त्यानंतर आरोपी आणि फिरयादीची त्यावर भेट झाली, ते एकमेकांना 2016 ते 2019 पर्यंत एकत्र होते, परंतु त्यानंतर आरोपीने दुसऱ्याच मुलीसोबत साखरपुडा केला, तेव्हा या फिर्यादिने याबद्दल आरोपीकडे विचारपुस केली असता, उलट या मुलाने आणि त्याच्या घरच्यांनी या तरुणीच्या दवाखान्यात जाऊन तिला शिवीगाळ केली.

एवढं सगळं करुन हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने ही डॉक्टर तरुणी काम करत असलेल्या हॉस्पीटलमध्ये फोन करुन तिची बदनामी केली. त्यानंतर त्याने या तरुणीच्या नावाने एक प्रोफाईल तयार केले. त्यानंतर त्याने यावर या तरुणीचे अश्लील फोटो देखील शेअर केले आणि तिचा फोन नंबर दिला.

ज्यानंतर या डॉक्टर तरुणीला वेगवेगळ्या नंबरवरुन कॉल येऊ लागले आणि समोरील व्यक्ती तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करु लागले. हे सगळं घडल्यानंतर तरुणीने लगेच पोलिस स्टेशन गाठले आणि गुन्हा दाखल केला.