Pune News: गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यातील नवले पुलावर (Pune Navale Bridge Accident) अपघाताची मालिका सुरूच असल्याचं दिसून येत होतं. अशातच आता रविवारी रात्री नवले पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तब्बल 30 ते 40 गाड्यांचं नुकसान (Accident 48 vehicles multiple vehicle) झालंय. यामध्ये सुमारे 40 ते 50 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
साताऱ्याहून मुंबईच्या (Satara To Mumbai) दिशेनं जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटलं आणि कंटेनर 25 ते 30 गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. त्यामुळे संपुर्ण रस्त्यावर ऑईल सांडल्याचं दिसतंय. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
आणखी वाचा - पुण्यातील माजी आमदारांच्या निधनानंतर त्यांच्या आईलाही 20 दिवसात देवाज्ञा!
Accident on Navale bridge #pune pic.twitter.com/K2Az5Q8c3u
— Piyush Bhusari (@piyushbTOI) November 20, 2022
नवले पुलावरील या भीषण अपघातातील जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले असल्याची माहिती समोर आली आहे. सिंहगड आणि दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, या अपघाताची (Navale Bridge Accident) माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही अपघाताची मालिका कधी थांबणार असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.