Pune News : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात सहकारनगरमध्ये सोमवारी रात्री एका इलेक्ट्रॅानिक्सच्या दुकानात स्फोट (Blast) झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला हा टीव्हीचा स्फोट असल्याचे सांगण्यात आले होता. हा स्फोट इतका भयानक होता मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला होता. आता या प्रकणाचा दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) तपास सुरु केला आहे. या स्फोटात दोनजण गंभीर जखमी झाला होता. मात्र स्फोटांत झालेलं नुकसान पाहता तपास यंत्रणांना संशय आल्याने एटीएसचा तपास सुरू सोमवारी पहाटे तीन वाजता हा स्फोट झाला होता.
या भीषण स्फोटानंतर दहशतवादी विरोधी पथकाने संशय व्यक्त केला आहे. स्फोटात झालेलं नुकसान पाहता तपास यंत्रणांनी स्फोटाच्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यातील सातारा रोडवरील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात हा भीषण स्फोट झाला होता. यामध्ये दोघेजण जखमी झाले होते. मात्र स्फोटाची तीव्रता पाहता दहशतवादी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून स्फोटानंतरचे काही फोटो देखील व्हायरल होत आहे. हा स्फोट इतका भीषण होता की दुकाने पत्रे उडून गेले. तसेच एका बाईकचा यामध्ये कोळसा झाला आहे. स्फोटानंतर दुकानातील इलेक्ट्रानिक्सच्या वस्तू बाहेर फेकल्या गेल्या.
सुरुवातीला दुकानामध्ये आग लागल्याचे वाटत होते. या आगीमध्ये इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने जळून खाक झाली होती. मात्र स्फोटाची तीव्रता इतकी होती यामध्ये रस्त्यावरुन जाणारे दोन जण जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चौकशीनंतर काही धागेदोरे हाती आल्यानंतर एटीएसने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.