Pune Porche Accident : गेल्या महिन्याभरापासून पुणे पोर्श कार अपघात चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहे. या घटनेनंतर देशभरात खळबळ माजी आहे. अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत मोटरसायकलवरील तरुण तरुणीला धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी त्या अपल्पवयीन मुलाला मारहाण केली.
विशाल अग्रवालाचा मुलगा लवकर सुटण्यासाठी आता मृतांनाच दोषी ठरवणार असल्याची सरकारची तयारी सुरु असल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय.. आधी अल्पवयीन आरोपीच्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलले आता मृतांच्या व्हिसेरा रिपोर्टमध्येही बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा खळबळजनक आरोप देशमुखांनी केलाय.
जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सुरु आहेत.
दरम्यान कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघातात पोलीस कसून चौकशी करत आहेत. अपघाताच्या दिवशी विशाल अग्रवालचा अल्पवयीन मुलगा हा हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता.
विशालच्या मुलासोबत पार्टीसाठी दोन ग्रुप होते. या ग्रुपमधील 15 मुलांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आलीय. चौकशीत मुलांनी पार्टीसाठी प्रत्येकी अडीच हजार रुपेय दिले, अशी माहिती त्यांनी दिली. उर्वरित बिल अल्पवयीन मुलांनी दिले, असं त्यांनी चौकशी दरम्यान सांगितलं. विशाल अग्रवालच्या मुलाने 48 हजारांचे पार्टीच बिल दिलं.