खडकवासलाने वाढवलं पुणेकरांचं टेन्शन! CM शिंदे Action मोडमध्ये; नागरिकांना हलवणार सुरक्षित स्थळी

Pune Rains Flood Like Situation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील संभाव्य पूरपरिस्थितीकडे स्वत: लक्ष घातलं असून अधिकारी आणि यंत्रणांना थेट आदेश दिल्याचं दिसून येत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 4, 2024, 12:18 PM IST
खडकवासलाने वाढवलं पुणेकरांचं टेन्शन! CM शिंदे Action मोडमध्ये; नागरिकांना हलवणार सुरक्षित स्थळी title=
पुण्यामध्ये पूर परिस्थितीची शक्यता (प्रातिनिधिक फोटो)

Pune Rains Flood Like Situation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याआधीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालिन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशा फोनवरून चर्चा केली आहे. ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषाच्या आत रहाणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकानथ शिंदे यांनी सर्व स्थलांतरीत नागरिकांच्या दोन्ही वेळ जेवणाची, रहाण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिलेत.

एकतानगरमध्ये पाणी भरण्यास सुरुवात

पुण्यातील एकतानगर भागात पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. एकतानगरमधील द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी भरलं आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील एकतानगरचा भाग जलमय झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

पूररेषेत सुमारे 3 लाख घरे 

शनिवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसहीत त्यांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये मनसेनं पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार व्हावा अशी मागणी अजय शिंदे, बाळा शेडगे आणि रणजित शिरोळे यांनी केली होती. पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकता नगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करावी. निळ्या पूर रेषेतील ( ब्ल्यू लाईन) नागरिकांचे कायमस्वरूपी पूनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका, जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा अशी मागणी देखील केली गेली. ज्याला मान्यता देत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. पुण्यातील पूरग्रस्त भागातील विशेषतः एकता नगर, सिंहगड याठिकाणी निळ्या पूररेषेत सुमारे 3 लाख घरे पण या ठिकाणी एफएसआय मिळत नसल्याने विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नाहीत असे निदर्शनास आणून दिले गेले. यावर याठिकाणी विशेष दर्जा देऊन पुनर्विकासाचे काम करावे तसेच तसा आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मनसेनं सांगितलं.

मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट; मुसळधार ते अती मुसळधार कोसळणार

मध्य महाराष्ट्राला हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केलाय. मुसळधार  ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे, साता-यात रेड अलर्ट आहे. तर मुंबईतही आज पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.  मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिधुदुर्ग, रायगड, नाशिक या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे. तर नागपूरमध्ये येलो अलर्ट आहे.

नाशिक: गोदावरीला पूर; रामकुंडावरची मंदिरं पाण्याखाली

नाशिक जिल्ह्यात गेल्या 48 तासात दमदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे दारणा धरणातून 22 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. तर नांदूर मधमेश्वर धरणातून 36 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले जातंय.. गंगापूर धरण 80 टक्के भरलं असून कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाणार. गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असून रामकुंडावरची मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. तर जायकवाडीला आज संध्याकाळपासून थेट 30 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होणार असल्याने जायकवाडीचा जलसाठाही वाढणार आहे. 

रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात पाऊस; दक्षिण भागात मात्र विश्रांती

अलिबाग, पेण , कर्जत, खालापूर, खोपोली भागात अधून मधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. दक्षिण रायगड जिल्ह्यात मात्र पावसाची विश्रांती आहे. आज रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे.