पुणे हादरलं! एकाच कुटूंबातील चौघांनी उचलंल टोकाच पाऊल

Shocking Story :पुण्यातील मुंढवा (Pune Mundhwa)परिसरात राहणाऱ्या एकाच कुटूंबातील चार जणांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती दिपक थोटे (59), पत्नी इंदू दिपक थोटे (45), मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) आणि मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

Updated: Jan 14, 2023, 02:05 PM IST
पुणे हादरलं! एकाच कुटूंबातील चौघांनी उचलंल टोकाच पाऊल  title=

Shocking Story : पुण्यातून (Pune)एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटूंबियातील चौघांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी (Police) या घटनेचा तपास सुरु केला आहे, तसेच कुटूंबियांनी सामुहिक आत्महत्या का केली? याचा तपास सूरू आहे. 

पुण्यातील मुंढवा (Pune Mundhwa)परिसरात राहणाऱ्या एकाच कुटूंबातील चार जणांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती दिपक थोटे (59), पत्नी इंदू दिपक थोटे (45), मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) आणि मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या सामुहिक आत्महत्येच्या घटनेने पुणे हादरले आहे. हे थोटे कुटूंब मुळचे अमरावतीचे होते,मात्र दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर भागात वास्तव्यास आले होते. 

या कुटूंबियांच्या नजीक राहणाऱ्या डॉ. दौलत पोटे यांना हे कुटुंबीय राहत असलेला घरचा दरवाजा बंद असल्याने संशय आला होता.या संशयातून त्यांनी केशवनगर पोलीस ठाण्यात या घटनेची माहीती दिली होती. पोलिसांना (Police) घटनेची माहिती मिळताच,तातडीने घटनास्थळ गाठत दरवाजा जोरजोरात आदळून उघडला असता, हा प्रकार समोर आला होता.

दरम्यान पोलिसांनी (Police)चौघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात पाठविले आहेत. या कुटूंबियाने आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. आता या घटनेत कुटुंबियांच्या मृत्यूचे काय कारण समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.