मुंबई : मंगळवारी सकाळी देशाच्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केल्यानंतर सायंकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधता. आपल्या संबोधनाच्या सुरुवातीलाच त्यांनी Coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयाचं समर्थन करत त्यांचे आभार मानले. शिवाय अनेक मुद्दे अधोरेखित करत मुख्यंत्र्यांनी आपल्यासोबत असणाऱ्या काही राजकीय व्यक्तींची नावं घेतली.
'राज ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार ही मंडळी माझ्यासोबत आहेत. राज आणि माझ्यात सातत्याने बोलणं सुरु आहे', असं म्हणत कोरोनाच्या संकटावरव मात करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वजण एकजुटीने प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोरोनाच्या या संकटसमयी होत असणारं एकमत पाहता, राजकीय वर्तुळात याविषटी चर्चाही सुरु झाल्याचं चित्र आहे.
ही वेळ राजकारण करण्याची नाही, हीच बाब ठाकरे यांनी वारंवार अधोरेखित केली. शिवाय या काळात केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं.
मुंबई | सोनिया गांधी, राज ठाकरे, शरद पवार आणि मौलवीसुद्धा माझ्यासोबत आहेत- उद्धव ठाकरे #कोरोना #corona #उद्धवठाकरे @OfficeofUT https://t.co/HOK58ckddW
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 14, 2020
कोणीही या वातावरणात राजकारण करण्याचा, अफवा पसरवण्याचा प्रयत्न करु नये असा सूरही त्यांनी आळवला. शिवाय त्यांच्या या संबोधनात भाजप नेत्यांच्या नावांचा कुठेही उल्लेख नव्हता. तेव्हा सध्याच्या घडीला राज्य सरकारच्या प्रयत्नांविरोधात अफवां उठवणाऱ्यांसाठी हा एक इशाराच होता हे खरं.