रत्नागिरी, रायगडमधील नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

रत्नागिरी आणि रायगड जिल्हात नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे.  

Updated: Jan 1, 2019, 04:03 PM IST
रत्नागिरी, रायगडमधील नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

रत्नागिरी / रायगड : कोकणात नगरपरिषद कर्मचाऱ्यांची नववर्षाची सुरुवात ही कामबंद आंदोलनाने झाली आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्हात नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिलेय. त्यानिमित्ताने कामबंद आंदोलन सुरु केले आहे. रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील नगरपरिषद कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. तर रायगडमध्ये आपल्‍या विविधमागण्‍यांसाठी नगरपरिष कर्मचारीही कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत आहेत. त्यामुळे नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नगरपरिषदांमधील काम ठप्प आहे.

रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील नगर परिषद कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत. राज्यातील नगर परिषद कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलीय. रत्नागिरी आणि राजापूर नगरपरिषदेतील १०० टक्के कर्मचारी संपात सहभागी झालेत. सकाळपासूनच रत्नागिरी आणि राजापूरच्या नगरपरिषदेत शुकशुकाट पाहायला मिळत होता. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारलाय. रत्नागिरी आणि राजापुरात नगरपरिषदेचे कर्मचारी संपावर गेल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

रायगडमध्ये आंदोलनामुळे कामकाज ठप्‍प 

रायगडमध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाची सुरूवात आंदोलनाने केली आहे. आपल्‍या विविधमागण्‍यांसाठी रायगड जिल्‍हयातील नगरपरिषद कर्मचारीही कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत आहेत. त्‍यामुळे जिल्‍हयातील ११ नगरपरिषद आणि ५ नगरपंचायतींमध्‍ये शुकशुकाट असून तेथील  कामकाज ठप्‍प झाले आहे. 

कर्मचाऱ्यांनी आज काळयाफिती लावून नगरपरिषदेसमोर निदर्शने केली.  नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. स्थानिक नागरिकांना या संपामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. मात्र कोणत्याही नव्या मागणीसाठी हे आंदोलन करत नसून शासनानेच दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी करण्याची मागणी आहे. वारंवार इशारा दिल्यानंतरही शासनाने मान्य मागण्यांची अंमलबजावणी केली नसल्याने ही भूमिका घ्‍यावी लागली, असे आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितले.