आरपीएफ जवानाने वाचवले महिलेचे प्राण, घटना सीसीटीव्हीत कैद

रेल्वे पोलीस बलाच्या जवानानं कर्तव्यावर असताना एक महिला प्रवाशाचे प्राण वाचवले.  ट्रेनमध्ये चढताना महिलेचा तोल गेला त्यानंतर ती प्लॅटफॉर्म आणि लोकल ट्रेनमधील पोकळीत पडणार होती. त्याच दरम्यान कर्तव्यदक्ष आरपीएफ जवानाने त्या महिलेचे प्राण वाचवले.

Updated: Jun 1, 2018, 01:40 PM IST

ठाणे : रेल्वे पोलीस बलाच्या जवानानं कर्तव्यावर असताना एक महिला प्रवाशाचे प्राण वाचवले.  ट्रेनमध्ये चढताना महिलेचा तोल गेला त्यानंतर ती प्लॅटफॉर्म आणि लोकल ट्रेनमधील पोकळीत पडणार होती. त्याच दरम्यान कर्तव्यदक्ष आरपीएफ जवानाने त्या महिलेचे प्राण वाचवले.

या जवानाने महिलेला अक्षरशः मृत्युच्या दाढेतून खेचून काढलं. गुरुवारी सकाळी ८ वाजून २२ मिनिटांनी कल्याण इथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे लोकल जात होती त्यावेळी ही घटना घडली.

लोकल मुंब्रा स्थनाकात आली. यावेळी प्रवाशी महिला लोकलमधे चढण्यास गेली असता लोकल सुरू झाली.  त्यावेळी तिचा पाय सटकला आणि ती रेल्वे आणि फलाटाच्यामध्ये जाऊ लागली त्यावेळी आरपीएफ जवान हसन पटेलने महिलेला तत्परतेने मागे खेचलं. हसन पटेल यांच्या कर्तव्यदक्षतेचं कौतुक होत आहे.