उदयनराजे भोसले यांच्या सुस्साट बाईक रायडिंगची जोरदार चर्चा

खासदार उदयनराजे भोसले हे त्याच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक तरुण त्यांच्या या स्टाईलमुळे त्यांचे फॅन बनलेले आहेत.  

Updated: Oct 23, 2020, 06:55 PM IST
उदयनराजे भोसले यांच्या सुस्साट बाईक रायडिंगची जोरदार चर्चा

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे त्याच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक तरुण त्यांच्या या स्टाईलमुळे त्यांचे फॅन बनलेले आहेत. त्यांच्या बोलण्याची स्टाईल असो वा कॉलर उडवण्याची असो, त्यांच्या वेगवेगळ्या आवडी निवडीमुळे पण प्रसिद्ध आहेत. 

त्यांना रायडिंगची खूप आवड आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. एका कार्यकर्त्यांनं एक मोटर बाईक घेतली आणि ती राजेंना दाखवायला आणली. मग काय, राजेंनी गाडी ताब्यात घेतली आणि अक्षरशः सुसाट राऊंड मारला. त्यानंतर राजेंचे मन भरलं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.