VIDEO: शहाजीबापू पाटलांचा Swag च वेगळा; 'काय झाडी, काय डोंगार...', आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही मोह आवरेना!

CM Eknath Shinde Group Guwahati: सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचा 'काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल...सगळं एकदम ओक्के' हा डायलॉग (Shahaji Bapu Patil Dialogue) चांगलाच गाजला होता.

Updated: Nov 27, 2022, 12:48 AM IST
VIDEO: शहाजीबापू पाटलांचा Swag च वेगळा; 'काय झाडी, काय डोंगार...', आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही मोह आवरेना! title=
shahaji bapu patil in guwahati

Shahaji Bapu Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेत उभी फूट पडली. राज्यातील राजकीय समीकरण बदललं अन् राज्याला भाजप शिंदे गटाचं नवं सरकार मिळालं. अशातच आता नवस फेडण्यासाठी आणि कामाख्या देवीचे दर्शनासाठी (Kamakhya Devi Darshan) शिंदे गटाचे आमदार गुवाहटीला जात असल्याचं वक्तव्य आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांनी केलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार आणि खासदार सहकुटुंब गुवाहटीला गेले आहेत. त्यावेळी शहाजीबापू पाटलांचा स्वॉग पहायला मिळाला.

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचा 'काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल...सगळं एकदम ओक्के' हा डायलॉग (Shahaji Bapu Patil Dialogue) चांगलाच गाजला होता. डायलॉग एवढा गाजला की, अनेकांच्या फोनच्या रिंगटोनला देखील सेट झाला. तर यावर अनेकांनी रिमिक्स गाणी देखील तयार केली. अनेक मिम्स देखील तयार करण्यात आले. अशातच आता त्याच राज्यात, तेच ठिकाणी अन् तोच डायलॉग असा योग पुन्हा पहायला मिळाला.

आणखी वाचा - Uddhav Thackeray: "तुमच्या काळ्या टोपीखाली काय दडलंय? महाराजांचा अपमान करणार असाल तर..."

शिंदे गटाचे सदस्य गुवाहटीला गेले असताना सर्वांनी शहाजीबापूंना डायलॉग म्हणण्याचा आग्रह केला. शहाजी बापूंना काय झाडी, काय डोंगार हा डायलॅाग बोलायला लावला. त्यावेळी विनंतीला मान देत शहाजी बापूंनी डायलॉग आहे तसा म्हणून दाखवला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा (Hemant Biswa Sharma) देखील उपस्थित होते. हेमंत बिस्वा शर्मा यांना देखील मोह आवरेना. त्यांनी पाटलांना डायलॉग म्हण्याची विनंती केली. शहाजी बापू पाटलांनी हा डायलॉग इंग्रजीत देखील बोलून दाखवला.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदार आणि खासदारांनी आज गुवाहाटीला जात कामाख्या देवीचं (Kamakhya Devi) दर्शन घेतलं. त्याआधी, आता काय डोंगर काय झाडी होणार नाही, आता काय शिंदे फडणवीस सरकार, काय त्याचा कारभार आणि काय महाराष्ट्र, सगळं एकदम ओक्के, असा डायलॉग देखील शहाजीबापू पाटलांनी मारला होता. त्यामुळे आता शिंदे गटाच्या वन्स अगेन गुवाहटी (Guwahati) चॅप्टर सुरू झाल्याचं दिसतंय.