ठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाही

ठाण्यातील महिला फेक पासपोर्टने थेट पाकिस्तानात पोहोचली...ती पाकिस्तानला कशी गेली,  कुठल्या मार्गानं गेली,  तिथून परत कशी आली ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरू...

वनिता कांबळे | Updated: Jul 24, 2024, 09:15 PM IST
ठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाही title=

Thane Women News : ठाण्यातील एक महिला थेट पाकिस्तानला जाऊन परत आली आहे. ती पाकिस्तानात फिरण्यासाठी किंवा काही कामानिमित्ताने गेली तव्हती तर ती लग्न करण्यासाठी गेली होती. पाकिस्तानात जाऊन लग्न करुन ही महिला ठाण्यात परत आली आहे. विशेष म्हणजे याचा कुणाला थांगपत्ता देखील लागला आहे. या महिलेच्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 

पाकिस्तानला कशी गेली,  कुठल्या मार्गानं गेली,  तिथून परत कशी आली?

ठाण्यातील ही महिला थेट पाकिस्तामध्ये जाऊन निकाह करून परत आल्याची माहिती समोर येतेय. बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवत पाकिस्तानचा व्हिसा मिळवल्याचं समजतंय... ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात राहणा-या या महिलेचं नाव नूर आहे. पाकिस्तानात राहणा-या बशीरसोबत तिनं निकाह केला होता. सनम नावानं पासपोर्ट बनवून ती पाकिस्तानला गेली. आता आई हाजरा परवीन आजारी असल्यानं नूर ऊर्फ सनम ठाण्यात परतलीय. वर्तकनगर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय... तिच्या सहका-यांचीही चौकशी सुरू केली आहे. ती पाकिस्तानला कशी गेली,  कुठल्या मार्गानं गेली,  तिथून परत कशी आली याची देखील ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. 

ऑनलाईन मैत्री झाली आणि प्रेम जडले

ठाण्यात राणाऱ्या नूरची पाकिस्तानातील तरुणाशी ऑनलाईन ओळख झाली होती. नूर ही विवाहित आहे.  फेसबुकच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली. यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रेमासाठी नूर थेट पाकिस्तानला गेली. तिथे जाऊन तिने प्रियकरासह लग्न केले. तीन महिने ती पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे राहिली.